Agrowon Podcast : कापसू वायदे ४ वर्षातील निचांकी पातळीवर; कापूस, सोयाबीन, मका, तसेच काय आहेत तूर दर?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, हरभरा, मका आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

कापूस निचांकी पातळीवर

कापसाच्या वायद्यांमध्ये मोठी नरमाई आली. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात भाव कमी झाले. घटलेली मागणी आणि व्यापाऱ्यांची विक्री यामुळे कापूस भावात नरमाई आली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे गेल्या ४ वर्षातील निचांकी पातळीवर पोचले. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ६८.२३ सेंट प्रतिपाऊंडवर आले. देशातील बाजारातही वायदे ५५ हजार ८२० रुपये प्रतिखंडीवर होते. तर बाजार समित्यांमधील भाव ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीन दबावातच

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावातील नरमाई कायम आहे. सोयाबीनची विक्री वाढल्याचा परिणाम भावावर दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत ११.१५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३१८ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव दबावातच आहेत. सोयाबीनला आजही ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Agrowon Podcast : हरभऱ्याचे भाव टिकून; कापूस, सोयाबीन, हरभरा तसेच काय आहेत मका दर ?

मक्याचे भाव तेजीतच

देशातील बाजारात मक्याचा भाव टिकून आहे. देशात यंदा मक्याला चांगला उठाव आहे. इथेनाॅल उद्योग यंदा मक्याचा वापर वाढविणार आहे. त्यामुळे पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाला मक्याचा काहीसा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मक्याचा भाव टिकून आहे. मक्याला सध्या सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांचा भाव मिळाला. एनसीडीईएक्सच्या डिलेव्हरी केंद्रावर २ हजार ९९८ रुपये भाव मिळाला. मक्याचा भाव तेजीतच राहतील, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

Agriculture Market
Sugar Industry : साखर, इथेनॉलच्या किमतीत वाढ करण्याची ‘विस्मा’ची मागणी

टोमॅटोचा बाजार टिकून

बाजारातील टोमॅटोची आवक गेल्या काही आठवड्यांपासून कमी होत आहेत. तर दुसरीकडे टोमॅटोला चांगला उठाव आहे. यामुळे टोमॅटोचा भाव टिकून आहे. टोमॅटोला बाजारात सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. राज्यातील अनेक भागात पुढील काळात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे टोमॅटोची आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे, असे व्यापारी सांगत आहेत. 

तुरीचा बाजार चढा

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरु झाले. आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत. याचा देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे. सध्या तुरीला सरासरी १० हजार ५०० ते ११ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com