Tendu Leaves Price: तेंदूपानाच्या प्रतिगोणी दरात ८.९७ ते ८.८७ टक्‍के वाढ

Tendu Leaves per-bundle Price Increase: नवीन वर्षात शासनाने प्रतिगोणी ८.९७ ते ८.८७ टक्‍के अशी वाढ केली आहे. या दरवाढीमुळे प्रतिशेकडा मजुरीतही वाढ होणार आहे.
Tendu Leaves
Tendu LeavesAgrowon
Published on
Updated on

Gadchiroli News: पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात तेंदूपानाच्या माध्यमातून उन्हाळ्यात रोजगाराची उपलब्धता होते. त्याकरिता शासनाकडून प्रतिगोणी दर निश्‍चित केला जातो. नवीन वर्षात शासनाने प्रतिगोणी ८.९७ ते ८.८७ टक्‍के अशी वाढ केली आहे. या दरवाढीमुळे प्रतिशेकडा मजुरीतही वाढ होणार आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातील तेंदू पानाला सर्वाधिक दर जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या भामरागड, सिरोंचा, आलापल्ली, गडचिरोली, वडसा या पाच वनक्षेत्रांत दर वर्षी उन्हाळ्यात विशेषतः एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तेंदूपाने संकलनाला सुरुवात होते.

Tendu Leaves
Tendu Leaf Business : खानदेशात तेंदू पत्ता व्यवसाय अडचणीत

त्यानुसार दर वर्षी हंगामाच्या सुरुवातीला शासनाकडून तेंदूपत्ता गोणीचे दर वाढविले जातात. त्याचा परिणाम तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांच्या मजुरीवरही होतो, तसेच त्यातही वाढ नोंदविली जाते.

२०२५ साठी तेंदूपाने संकलन हंगामासाठी राज्य शासनाने शासकीय भूमीतून खरेदीसाठी प्रतिगोणी चार हजार २५० रुपये, तर खासगी क्षेत्रातून तेंदूपाने खरेदीसाठी चार हजार ३०० रुपये असा दर जाहीर करण्यात आला आहे. प्रतिगोणी दरवृद्धीची अनुक्रमे टक्‍केवारी ८.९७ व ८.८६ एवढी आहे. या संदर्भात शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.

Tendu Leaves
Tendu Leaves : जंगलात शोधता मिळेना तेंदूपत्ता

महिन्यात ग्रामीण भागात सर्वदूर तेंदूपाने संकलनाचे काम होते. यातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळतो. आता प्रतिगोणी दरातील वाढीमुळे मजुरीतही वाढ होईल.

गेल्या हंगामात ७.१५ कोटींचा महसूल

२०२४ या तेंदूपाने हंगामात जिल्ह्यातील पाच वन क्षेत्रात तेंदू घटक विक्रीतून सात कोटी १५ लाख रुपयांचा महसूल वनविभागाला प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे वनविभागाच्या वतीने संकलन केलेल्या तेंदूपासून मिळालेल्या महसुलाचा यात समावेश आहे. जिल्ह्यात ग्रामसभांच्या माध्यमातून सर्वाधिक तेंदूपाने संकलन होते. अधिक दर मिळणार असल्याने ग्रामसभा मालामाल होणार आहेत.

चार वर्षांतील प्रतिगोणी दर (वर्ष, शासकीय, खासगी जमीन)

२०२२ : ३४०० - ३४५०

२०२३ : ३६५० - ३७००

२०२४ : ३९०० - ३९५०

२०२५ : ४२५० - ४३००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com