Tendu Leaf Business : खानदेशात तेंदू पत्ता व्यवसाय अडचणीत

Tendu Leaf Damage : खानदेशात सातपुडा पर्वतातील तेंदू पत्ता व्यवसाय यंदा प्रतिकूल वातावरण, वादळी पाऊस आदी कारणांनी अडचणीत आला आहे. वादळात तेंदू पत्ता गळून नुकसान झाले आहे.
Tendu Leaf
Tendu Leaf Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात सातपुडा पर्वतातील तेंदू पत्ता व्यवसाय यंदा प्रतिकूल वातावरण, वादळी पाऊस आदी कारणांनी अडचणीत आला आहे. वादळात तेंदू पत्ता गळून नुकसान झाले आहे. तसेच झाडांवरून तोडलेली पाने व्यवस्थित वाळत नसल्याने खरेदीदार त्याचे लिलाव, व्यवहार प्रलंबित ठेवत आहेत.

Tendu Leaf
Tendu Leaf : तेंदू पाने संकलन करणाऱ्या मजुरांना मजुरी देण्यास मान्यता

खानदेशात नंदुरबारातील अक्कलकुवा, धडगाव, शहादा, धुळ्यातील शिरपूर, जळगावातील यावल, रावेर भागात सातपुडा पर्वतात तेंदूपत्ता व्यवसाय आहे. वन क्षेत्रात ही झाडे असून, कायद्यानुसार या झाडांचे संवर्धन, व्यापारविषयक अधिकार स्थानिक ग्रामपंचायतींना आहेत.

या ग्रामपंचायती स्थानिक संस्था, गटांना तेंदू पत्ता तोडून त्याची विक्री, संवर्धन आदींचे कंत्राट, करार करतात. सर्वाधिक व्यवसाय नंदुरबारात आहे. त्यापाठोपाठ जळगावातील सातपुड्यात हा व्यवसाय आहे.

Tendu Leaf
Tendu : तेंदू मजुरांची २० कोटी रुपयांची मजुरी थकित

एप्रिल व या महिन्यात हा व्यवसाय गती घेतो. परंतु यंदा सातपुड्यात भर उन्हाळ्यात वादळी पाऊस, हलकी गारपीट व प्रतिकूल स्थिती राहिली. यामुळे तेंदूपत्ता मोठ्या प्रमाणात गळून त्याची हानी झाली आहे. संबंधित गट, संस्थांना व्यवसाय करताना नुकसान सहन करावे लागत आहे. ग्रामपंचायतींचे निधी संकलनही कमी झाले आहे.

संकलन सुरू; व्यवहार ठप्प

यावल, रावेर, धडगाव भागात अनेक गट, संस्थांचे तेंदूपत्ता संकलन सुरू आहे, परंतु त्याचे व्यवहार ठप्प असल्याने वित्तीय संकटे तयार झाल्याची स्थिती आहे. पुढे पावसाळा असेल. या काळात हा व्यवसाय बंद राहील. यामुळे यंदा तेंदूपत्त्यातून संबंधित करारधारक गट, ग्रामपंचायतींचे वित्तीय नुकसान झाल्याची माहिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com