Employment Guarantee Scheme : विक्रमगड तालुक्यात चोवीस हजार हातांना रोजगार

MGNREGA : नोंदणीकृत मजुरांना सरकारच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत स्थानिक ठिकाणीच रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे.
MGNREGA
Employment Guarantee Scheme Agrowno
Published on
Updated on

Palghar News : नोंदणीकृत मजुरांना सरकारच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत स्थानिक ठिकाणीच रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. रोजगार देण्याची प्राथमिक जबाबदारी असलेल्या तहसील यंत्रणा आणि पंचायत समिती यंत्रणेकडून प्रत्येकी ५० टक्के कामे करणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीत विविध यंत्रणांच्या माध्यमातून कामांना गती येत असून तालुक्यातील २४ हजार २२४ मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

विक्रमगड, जव्हार, मोखाडा हे आदिवासी ग्रामीण तालुके म्हणून ओळखले जातात. या भागात शेतीव्यतिरिक्त अन्य कोणताही मोठा रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे शेतीची कामे आटपल्यानंतर या मजुरांच्या हाताला काम नसते.

MGNREGA
MGNREGA : ‘मनरेगा’तून २६३ विहिरी, तर ४७५ गोठ्यांची उभारणी

कामाच्या शोधात हे मजूर आपल्या मुला-बाळांसह कुटुंबासह अन्य कामाच्या ठिकाणी स्थलांतरित होतात, मात्र सरकारने हे स्थलांतर स्थाबविण्याचे दृष्टीने या मजुरांची नोदणी करून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातच मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची तरतूद केल्याने होणारे स्थलांतर कमी होत चालले आहे.

तालुक्यात सरकारच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. या कामांमुळे येथील मजुरांचे स्थलांतर कमी झाले असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाच्या रोजगार हमी विभागाकडून देण्यात आली आहे.

MGNREGA
MGNREGA : सातारा जिल्ह्यात रोजगार हमी योजनेत अनागोंदी

विक्रमगड तालुक्यात ५२३ कामे

रोहयो योजनेच्या माध्यमातून सरकार मजुरांना १०० दिवस काम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तहसीलदार, तसेच पंचायत समिती विभागातील विविध यंत्रणांची आहे. आज पंचायत समिती स्तरावरील नाला खोलीकरण, गाय गोठा बांधणे, घरकुल, प्लेव्हरब्लॉक, वृक्ष लागवड, माती रस्ता अशी एकूण ५२३ कामे सुरू आहेत.

तहसीलदार विभागाकडून १२९ कामे

तहसीलदार विभागाकडून कृषी, वन विभागाची १२९ कामे सुरू असून नऊ हजार ५६३ मजुरांना काम मिळाले. रोजगार हमी जलसंधारणाच्या कामामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे. जलसंधारणच्या कामामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झालेली पहावयास मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com