Tendu Leaves : जंगलात शोधता मिळेना तेंदूपत्ता

Tendu Tree : सरकारी धोरणानुसार तेंदूपत्ता संकलन करण्यात यायचे. मात्र संकलनकर्ते तेंदूपत्ते मिळविण्यासाठी उंच झाडांची कत्तल करायचे. त्याचा परिणाम कालांतराने टेंभूर्णीच्या वृक्ष वाढीवर झाला. सध्या तेंदूच्या वनात आणि वृक्षात कमालीची घट झाली.
Tendu Patta
Tendu PattaAgrowon

Vardha News : सरकारी धोरणानुसार तेंदूपत्ता संकलन करण्यात यायचे. मात्र संकलनकर्ते तेंदूपत्ते मिळविण्यासाठी उंच झाडांची कत्तल करायचे. त्याचा परिणाम कालांतराने टेंभूर्णीच्या वृक्ष वाढीवर झाला. सध्या तेंदूच्या वनात आणि वृक्षात कमालीची घट झाली.

संकलित होणारा तेंदूपत्ता निम्म्यावर आला. रोजगारावर परिणाम झाला. या हंगामी व्यवसायाकडे मजुरांनी पाठ फिरविली आहे. मात्र याकडे संबंधित विभागाने लक्ष वेधून तेंदू वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्याची गरज आहे. जिल्ह्यात जंगल क्षेत्रालगत तेंदू संकलन केंद्र चालायचे. मात्र कालांतराने बरीच केंद्र बंद झाली आहे.गिरड युनिट अंतर्गत पूर्वी १६ संकलन केंद्र होते. आता आठ केंद्रावर तेंदूचे संकलन होत आहे.

Tendu Patta
Tendu Leaf Business : खानदेशात तेंदू पत्ता व्यवसाय अडचणीत

गिरड प्रभागातील गावातून १२ ते १४ लाख तेंदू पुडे संकलित व्हायची. सध्या हा आकडा सहा लाखांच्या आसपास आला आहे. हजारो हातांना मिळणाऱ्या व्यवसायात फक्त तीनशे मजूर कार्यरत आहे. याविषयी जुन्या जाणत्या मजुरांशी विचारणा केली असता अन्य जिल्ह्याप्रमाणे आम्हाला २०१७ पासून बोनस मिळाले नसल्याने आम्ही तेंदू पत्ता संकलनाकडे पाठ फिरविली असल्याचे त्यांनी सांगितले.

Tendu Patta
Tendu Leaf : तेंदू पाने संकलन करणाऱ्या मजुरांना मजुरी देण्यास मान्यता

जंगलातून (टेंभूर्णी) तेंदूची झाडे होताहेत गायब

गत दशकात मोठ्या प्रमाणात जंगल शेजारी आणि जंगलात तेंदूची झाडे मिळायची. सहज उपलब्ध व्हायची. मात्र तेंदू संकलनादरम्यान काही झाडांच्या फांद्या तोड झाल्याने झाडांचे फुलण फलंण मंदावले. नवीन बीजाची आणि रोपांची निर्मिती थांबली. यामुळे जंगलातून तेंडूची झाडे कमी झाली आहेत. या प्रजातींच्या झाडांचे संवर्धन केल्या गेले नाही तर भविष्यात तेंदू जंगलातून नामशेष होईल. अशी प्रतिक्रिया निसर्ग अभ्यासक चक्रधर भगत यांनी दिली.

पूर्वी आम्हा मजुरांना बोनस मिळायचे त्यामुळे कामात उत्सुकता असायची. मात्र २०१७ पासून आम्हाला बोनस मिळाले नाही. त्यामुळे तेंदू संकलन बंद केले.
संतोष नैताम, तेंदू संकलक, शिवणफळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com