Vegetable Market : कोल्हापुरात कोथिंबिरीची आवक चौपटीने वाढल्याने दरात घट

Coriander Rate : गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत सध्या बाजार समितीत कोथिंबीरीची आवक चार पट वाढली आहे.
Coriander Rate
Coriander RateAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : पंधरवड्यापूर्वी कोथिंबीर पेंडीचा शेकडा पाच हजार रुपयांपर्यंत गेलेला दर पंधरवड्यात ४०० रुपयापर्यंत घसरल्याने कोथिंबीर उत्पादकांत अस्‍वस्थता निर्माण झाली आहे. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत सध्या बाजार समितीत कोथिंबीरीची आवक चार पट वाढली आहे. या तुलनेत मागणी कमी असल्याने दरात घट झाली आहे.

उन्‍हाळ्यात कशी तरी पाण्याची तजवीज करून उत्पादकांनी कोथिंबिरीचे उत्‍पादन घेतले. विशेष करून जूनच्या पंधरवड्यापर्यंत कोथिंबिरीला चांगली मागणी होती. या काळात लग्‍न सराईमुळे मागणीत सातत्‍य होते. सध्या मात्र कोथिंबिरीच्या मागणीत अचानकच घट झाली. तर याउलट कोथिंबिरीची आवक दिवसेंदिवस वाढत गेली.

Coriander Rate
Coriander Rate : चाकणला उन्हाळ्यातही कोथिंबीर मातीमोल

बाजार समितीत सध्या कोथिंबिरीची दररोजची आवक पंचवीस हजार जुड्यांपेक्षा जास्त होत आहे. ही कोथिंबिरीची विक्री करायची कोठे, असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांबरोबर घाऊन व्यापाऱ्यांनाही पडला आहे. याचा विपरित परिणाम दर घसरणीवर झाला आहे. सातत्याने दर कमी होत असल्याने उत्पादक हबकला आहे.

विशेष करून पश्चिम भागात तुलनेने जादा पाऊस आहे. यामुळे शेतात पाणी साचून रहात आहे. त्यामुळे कोथिंबीर कुजून सर्वच नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी कोथिंबिरीची काढणी जादा प्रमाणात करत आहेत. यामुळे बाजारपेठेत कोथिंबिरीची आवक वाढत असल्‍याचे शेतकरी व व्यापाऱ्यांनी सांगितले.

Coriander Rate
Coriander Rate : कोथिंबीर अमरावतीत दबावात, नागपुरात तेजीत

शेतकरी आर्थिक संकटात

बाजारपेठेत कोथिंबिरीच्या दरात घट झाल्याने काढणीचा आणि कीटकनाशकांचा खर्च निघत नसल्याने हेरवाड (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्याने कोथिंबिरीच्या प्लॉटवर रोटर फिरवत संताप व्यक्त केला.

प्रत्येकवर्षी पावसाळ्यात कोथिंबिरीला चांगला भाव मिळतो म्हणून एरवी शेतमजुरी करणारा अमोल बरगाले या अल्पभूधारक शेतकऱ्याने ४० हजार रुपये कर्ज काढून कोथिंबिरीचा पेरा घेतला होता. उत्पादन सुरू होण्यावेळीच दराच घट सुरू झाल्‍याने कोथिंबीर काढण्याचा खर्चही त्यांना मिळाला नाही. अखेर नाईलाजाने त्यांनी ३० गुंठे क्षेत्रावरील कोथिंबीर प्लॉटवर रोटर फिरवून पीक काढून टाकले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com