
Sangli News: यंदाचा हंगाम बेदाणा निर्मितीपासून द्राक्षाची टंचाई भासली होती. त्यामुळे बेदाण्याचा हंगाम एक महिना अगोदर थंडावला आहे. सद्यःस्थितीला पाच टक्के शेडवर बेदाणा तयार करण्याचे काम सुरू असून, येत्या आठ दिवसांत हंगाम पूर्णपणे बंद होणार आहे. राज्यात बेदाण्याचे उत्पादन ३५ टक्क्यांपर्यंत घटण्याचा प्राथमिक अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकरांनी व्यक्त केला आहे.
बेदाणा निर्मितीच्या पट्ट्यात सुमारे तीन हजारांहून अधिक शेड आहे. या शेडवर डिसेंबरपासून बेदाणा तयार करण्याचे नियोजन केले जाते. जानेवारीच्या मध्यापासून बेदाणा तयार करण्यासाठी हळूहळू गती येते. दोन ते अडीच महिना बेदाणा हंगाम सुरू राहतो. द्राक्ष हंगामात नैसर्गिक संकट ओढावले. त्याचा फटका बेदाणा निर्मितीवर झाला होता. परिमाणी बेदाणा हंगाम एक महिना उशिरा सुरू झाला. परंतु हंगामाच्या प्रारंभापासून बेदाणा निर्मिताला द्राक्षाची टंचाई निर्माण झाली. या साऱ्यामुळे बेदाणा निर्मितीच्या पट्ट्यात बेदाणा शेड पन्नास टक्केच सुरू झाली. अशा परिस्थितीही शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मिती सुरू केली असल्याचे चित्र होते.
राज्यात गतवर्षी २ लाख ८४ हजार ६६६ टन इतके बेदाण्याचे उत्पादन झाले होते. यंदाच्या हंगामात बेदाणा निर्मितीच्या पट्ट्यात अंदाजे एक ते दीड हजार शेडवर बेदाणा तयार करण्यासाठी शेडमालकांनी पुढाकार घेतला होता. त्यापैकी पन्नास टक्केच शेडवर बेदाणा तयार होऊ लागला. त्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यात बेदाण्याचे उत्पादन २५ टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, बेदाणा निर्मिताला गती आली नाही.
दीड महिन्यात हंगाम आटोपला
दरवर्षी बेदाणा निर्मितीचा हंगाम दोन ते अडीच महिने सुरू राहतो. मात्र यंदा द्राक्षाला चांगले दर असल्याने बेदण्याच्या द्राक्षाचीही विक्री शेतकऱ्यांनी केली. त्यामुळे यंदाचा बेदाणा हंगाम अवघा दीड महिन्यात आटोपला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.