Raisin Price: बेदाणा दर ५० रुपयांनी वाढले; शेतकऱ्यांना दिलासा!

Raisin Production Drop: यंदा बेदाण्याच्या उत्पादनात घट झाल्याने बाजारपेठेत त्याची मोठी मागणी निर्माण झाली आहे. पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने दर ५० रुपयांनी वाढले असून, यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
Raisin
RaisinAgrowon
Published on
Updated on

Sangli News: यंदा बेदाण्याचे उत्पादन घटले असल्याने बाजारपेठेत आवक कमी आहे. त्यामुळे बेदाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे बेदाण्याच्या दरात वाढ होऊ लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांत बेदाण्याला प्रति किलोस तब्बल ५० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नैसर्गिक संकटामुळे द्राक्षाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे यंदा बेदाण्याला द्राक्षाची टंचाई भासली आहे. यामुळे द्राक्षाच्या कमतरतेमुळे यंदा बेदाण्याचे उत्पादन घटले आहे. बेदाण्याचा निर्मितीचा हंगाम जवळपास संपला आहे. यंदा बेदाण्याचे किती उत्पादन होईल हे या आठवड्यात चित्र स्पष्ट होईल.

Raisin
Raisin Production: बेदाण्याचे उत्पादन धोक्यात! यंदा २५ टक्के घट होण्याचा अंदाज

सांगली तासगाव आणि पंढरपूर या बेदाण्यांच्या बाजारात फेब्रुवारी महिन्यापासून नवीन बेदाण्याची आवक सुरू झाली. सुरुवातीच्या काळामध्ये बेदाण्याची आवक कमी होती. त्यामुळे हंगामाच्या प्रारंभापासून बेदाण्याच्या दरात वाढ झाली आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सांगली आणि तासगाव बाजार समितीत अनुक्रमे ६०० टन, तर पंढरपूर बाजार समितीत २५० टन प्रत्येक सौद्याला आवक झाली होती. या दरम्यान हिरवा बेदाणा १७० ते २५०, पिवळा बेदाणा १६० ते २००, काळा बेदाणा ७० ते ११० प्रति किलो असे दर मिळाले.

Raisin
Raisin Market Sangli : सांगलीतील तासगाव बाजार समितीत पहिल्याच सौद्यात ४९ टन नव्या बेदाण्याची आवक

सध्या सांगली बाजार समितीत एक हजार टन, तासगाव बाजार समिती दीड हजार टन, तर पंढरपूर बाजार समितीत दोन हजार टन बेदाण्याची आवक होत आहे. यंदा बेदाण्याचे उत्पादन घटल्याने बाजार समितीत बेदाण्याची आवक ही मंदावल्या असल्याचे चित्र आहे. आवक कमी असल्याने बाजारपेठेत बेदाण्याचा उठाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे बेदाण्याचे दरही टप्प्याटप्प्याने वाढत असल्याचे चित्र आहे.

बाजारात बेदाण्याची फारशी आवक वाढणार नसल्याचे बेदाणा व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. बेदाण्याची मागणी अधिक आहे आणि पुरवठा कमी असल्याने येत्या काळात बेदाण्याच्या दरात अजून वाढ होण्याची अंदाज उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

बेदाण्याचे दर प्रति किलोत

हिरवा बेदाणा २४० ते ३२५

पिवळा बेदाणा २०० ते २५०

काळा बेदाणा ६० ते १२०

पोषक वातावरणामुळे दर्जा उत्तम

बेदाणा निर्मिती हंगाम मध्यावर आल्यानंतर वादळी वाऱ्यासह गारपीट मोठ्या प्रमाणात होते. त्याचा परिणाम बेदाणा निर्मितीवर होतो. या नैसर्गिक संकटामुळे बेदाणाचा दर्जा घसरतो. त्यामुळे प्रतवारीनुसार बेदाणाला दर मिळतो. मात्र यंदा बेदाण्याच्या हंगामामध्ये नैसर्गिक संकट ओढावले नाही. तसेच पोषक वातावरण असल्याने दर्जेदार बेदाणा तयार झाला आहे.

गतवर्षीपेक्षा बेदाण्याला दर चांगले आहे. दर टिकून आहे. त्यामुळे यंदा समाधान आहेत. बेदाण्याची विक्री टप्प्याटप्प्याने करणार आहे.
सुरेश कोडग, आगळगाव, ता. कवठेमहांकाळ, बेदाणा उत्पादक उमदी, ता. जत
यंदा बेदाण्याचा दर्जा चांगला आहे. बेदाण्याच्या प्रतवारीनुसार दर आहेत. पुरवठा कमी आणि मागणी जास्त यामुळे बेदाण्याची दर वाढत आहेत.
सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com