Agriculture Commodity Market : मूग, कांदा, टोमॅटोच्या आवकेत वाढ

Moong Price Drop : या सप्ताहात मूग, कांदा व टोमॅटोची आवक वाढली. मुगाची आवक मुख्यत्वे उत्तर प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र येथे झाली. त्यामुळे मुगाच्या किमती घसरत आहेत.
Agriculture Market Update
Agriculture Market Update Agrowon
Published on
Updated on

फ्यूचर्स किमती : सप्ताह ७ ते १३ जून २०२५

१ जून ते १३ जून दरम्यान देशातील पाऊस सरासरीपेक्षा ३३ टक्क्यांनी कमी झाला. महाराष्ट्रात तो ३२ टक्क्यांनी कमी झाला. महाराष्ट्रातील सर्व विभागांत (कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ) तो सरासरीपेक्षा कमी होता.

या सप्ताहात मूग, कांदा व टोमॅटोची आवक वाढली. मुगाची आवक मुख्यत्वे उत्तर प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र येथे झाली. त्यामुळे मुगाच्या किमती घसरत आहेत. १ जून ते १३ जून या दरम्यान अहमदनगर येथील किमती रु. ६,२५० वरून रु. ५,२५० पर्यंत, तर अकोल्यातील किमती रु. ७,००० वरून रु. ६,०७० पर्यंत घसरल्या. मुगाच्या किमती हमीभावापेक्षा बऱ्याच कमी आहेत.

१३ जून २०२५ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) या सप्ताहात ०.१ टक्क्याने वाढून रु. ५४,१४० वर आले आहेत. जुलै फ्यूचर्स भाव सुद्धा ०.८ टक्का घसरून रु. ५३,१५० वर आले आहेत. सप्टेंबर भाव रु. ५६,००० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३.४ टक्क्यांनी अधिक आहेत. अमेरिकेतील कापसाचे भाव या सप्ताहात स्थिर राहिले.

NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) गेल्या सप्ताहात रु. १,५०७ वर आले होते. या सप्ताहात ते २.१ टक्क्यांनी वाढून रु. १,५३९ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स १.८ टक्का वाढून रु. १,५८२ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा २.८ टक्क्यांनी अधिक आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५८१ वर आले आहेत.

कापसाचे या वर्षासाठी (२०२५-२६) हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,७१० व लांब धाग्यासाठी रु. ८११० आहेत. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा कमी आहेत.

मका

NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (गुलाबबाग) गेल्या सप्ताहात रु. २,२२० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. २,२३० वर आल्या आहेत. जुलै फ्यूचर्स किमती रु. २,२४३ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स रु. २,२७८ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव २.२ टक्क्यांनी अधिक आहे. मक्याचा हमीभाव रु. २,४०० आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा कमी आहेत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात

०.४ टक्का वाढून रु. १४,५६४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.६ टक्का घसरून रु. १४,४७१ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती १.३ टक्क्याने घसरून रु. १४,७१४ वर आल्या आहेत. ऑक्टोबर किमती रु. १५,०६२ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ४.१ टक्क्यांनी अधिक आहेत. सांगलीमधील (राजापुरी) स्पॉट भाव ०.३ टक्का घसरून रु. १६,१५१३ वर आला आहे.

Agriculture Market Update
Maize Cultivation: दरस्थिरतेमुळे मराठवाड्यात मका लागवड वाढणार

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ५,८०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या घसरून रु. ५,६७५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) ६.८ टक्क्यांनी घसरून रु. ७,१७५ वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,७६८ जाहीर झाला आहे. सध्याचा भाव हमीभावापेक्षा बराच कमी आहे. नवीन पिकाची आवक वाढती आहे.

Agriculture Market Update
Moong Procurement : मध्य प्रदेश सरकारची अखेर मूग खरेदीची घोषणा

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) रु. ४,३६८ वर आली होती. या सप्ताहात ती ०.६ टक्का वाढून रु. ४,३९४ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ५,३२८ आहे. नवीन पिकाची आवक आता कमी होऊ लागली आहे. हमीभावापेक्षा बाजारभाव कमी आहे. अमेरिकेतील सोयाबीनचे भाव या सप्ताहात २.३ टक्क्यांनी वाढले.

तूर

गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) रु. ६,४९० वर आली होती. या सप्ताहात ती १.१ टक्क्याने वाढून रु. ६,५६१ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ८,००० आहे. आवक कमी होऊ लागली आहे. सध्याचा भाव हमीभावापेक्षा कमी आहे.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत या सप्ताहात वाढून रु. १,६१७ वर आली आहे. कांद्याची आवक या सप्ताहात पुन्हा वाढलेली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,३९५ वर आली होती; या सप्ताहात ती वाढत्या आवकेमुळे पुन्हा रु. १,७०० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com