Pulses Mission: कडधान्य मिशनचा पंजाबला होणार फायदा; तूर, उडीद, मसूर हमीभावाने खरेदी

MSP guarantee: अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कडधान्य मिशनमधून तूर, उडीद आणि मसूरची पूर्ण खरेदीची हमी देण्यात आली आहे. याचा फायदा पंजाबला चांगला होणार आहे. पंजाब सरकार मागील काही वर्षांपासून गहू आणि भाताचे क्षेत्र कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
Pulses
Pulses Agrowon
Published on
Updated on

Pune News: अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कडधान्य मिशनमधून तूर, उडीद आणि मसूरची पूर्ण खरेदीची हमी देण्यात आली आहे. याचा फायदा पंजाबला चांगला होणार आहे. पंजाब सरकार मागील काही वर्षांपासून गहू आणि भाताचे क्षेत्र कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र गहू आणि भात हमीभावाने खरेदीची शाश्वती असल्याने शेतकरी इतर पीके घेत नव्हती. पण आता कडधान्य खरेदीचीही शाश्वती आहे. त्यामुळे शेतकरी गहू आणि भाताऐवजी कडधान्याचे उत्पादन घेतील.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात कडधान्य आत्मनिर्भरता मिशनची घोषणा केली. या मिशनमधून देशातील कडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. हे मिशन ६ वर्षांसाठी असेल. त्यासाठी अर्थमंत्र्यांनी १ हजार कोटींचा निधी दिला आहे. या मिशनमधून सरकारने पुढील ४ वर्षांसाठी तूर, उडीद आणि मसूर उत्पादन वाढीचे उद्दीष्ट ठेवले आहे. शेतकऱ्यांकडून या कडधान्याची नाफेड आणि एनसीसीएफ खरेदी करणार आहे. या दोन्ही एजन्सीकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण तूर, उदीद आणि मसूर खरेदीची शाश्वती देण्यात आली आहे.

Pulses
Pulses Import: तूर, हरभरा, वाटाणा आयात यंदा विक्रमी होणार; आयातवाढीचा शेतकऱ्यांना बसतोय फटका

केंद्राने जाहीर केलेल्या कडधान्य मिशनचा पंजाबला चांगला फायदा होणार आहे. कारण पंजाबमध्ये गहू आणि तांदूळ या जास्त पाणी आणि खते लागणाऱ्या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. सरकरा या दोन्ही पिकांची हमीभावाने खरेदी करते. त्यामुळे जमिनितील पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून जमिनिचा पोतही खराब होत आहे. तसेच वातावरणावर आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे पंजाब सरकार पीक पध्दतीत बदल करण्याचा प्रयत्न करत आहे.

परंतु गहू आणि भाताप्रमाणे इतर पिकांची हमीभावाने खरेदीची शाश्वती नाही. तसेच इतर पिकांचे बाजारभाव सतत कमी होत आहेत. त्यामुळेच शेतकरी गहू आणि भात पीक सोडायला तयार नाहीत. मात्र कडधान्य मिशनमधून पंजाबमधील शेतकऱ्यांना आता मसूर लागवडीचा पर्याय मिळाला आहे. तसेच मसूरची हमीभावाने खरेदीचीही पंजाब सरकारने शाश्वती दिली आहे. त्यामुळे शेतकरी मसूरसह इतर कडधान्य उत्पादनाकडे वळण्यास पोत्साहन मिळणार आहे.

Pulses
Pulses Import: तूर, हरभरा, वाटाणा आयातीचे विक्रम

पंजाबमधील शेतकरी मागील काही वर्षांपासून केवळ गहू आणि भातच नाही तर संपूर्ण पिकांची हमीभावाने खरेदीची मागणी करत आहेत. सरकारने आता कडधान्याची खरेदी हमीभावाने करण्याची हमी दिल्याने शेतकऱ्यांना पर्याय मिळणार आहे. पंजाबमधील शेतकरी गहू आणि भाताऐवजी काही क्षेत्रात कडधान्याची लागवड करू शकतात. कारण आता गहू आणि भाताप्रमाणेच बाजारातील अस्थिरतेचा परिणाम त्यांच्या भावावर होणार नाही. हमीभाव मिळेल.

गहू आणि भाताला हमीभावाची शाश्वती असल्याने मागील काही वर्षांपासून पंजाबमधील कडधान्याची लागवड कमी झाली. १९६० मध्ये खरिप आणि रब्बी हंगामात पंजाबमध्ये ९.१७ लाख हेक्टवरवर कडधान्याची लागवड झाली होती. तर उत्पादन ७ लाख २६ हजार टन होत. मात्र २०२३-२४ मध्ये लागवड केवळ २३ हजार हेक्टरवर झाली होती. आता कडधान्य मिशनमधून पंजाबमध्ये पुन्हा कडधान्याची लागवड वाढीसाठी मदत होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com