Chana Wheat Sowing : रब्बीत हरभरा, गहू, भात लागवडीला शेतकऱ्यांची पसंती; एकूण कडधान्याची पेरणी पडली पिछाडीवर 

Rabi Season : रब्बीच्या पिकांची पेरणी १६ डिसेंबरपर्यंत ५५८ लाख ८० हजार हेक्टरवर झाली होती. गव्हाची पेरणी गेल्यावर्षीपेक्षा ३.१४ टक्क्यांनी आघाडीवर आहे. तर हरभरा पेरणी जवळपास २ टक्क्यांनी आघाडीवर होती.
Chana And Wheat
Chana And WheatAgrowon
Published on
Updated on

Pune News : रब्बीच्या पिकांची पेरणी १६ डिसेंबरपर्यंत ५५८ लाख ८० हजार हेक्टरवर झाली होती.  गव्हाची पेरणी गेल्यावर्षीपेक्षा ३.१४ टक्क्यांनी आघाडीवर आहे. तर हरभरा पेरणी जवळपास २ टक्क्यांनी आघाडीवर होती. मात्र एकूण कडधान्य पेरा आता काहिसा पिछाडीवर दिसत आहे. तसेच एकूण भरडधान्य आणि तेलबिया पिकांचाही पेरणा कमी झाला. मात्र भात आणि मक्याची लागवड वाढलेली दिसत आहे.

देशात यंदा रब्बी पिकांची पेरणी करण्यासाठी पोषक हवामान होते. त्यामुळे यंदा सुरुवातीपासूनच पेरणीचा वेग गेल्यावर्षीपेक्षा जास्त होता. परंतु पेरणी आता अंतिम टप्प्याकडे जात आहे. देशात १६ डिसेंबरपर्यंत रब्बीची पेरणी ५५८ लाख ८० हजार हेक्टरवर झाली. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत ५५६ लाख ६७ हजार हेक्टरवर रब्बीचा पेरा झाला होता. म्हणजेच यंदा पेरणी काहिशी आघाडीवर आहे. मात्र सरासरी रब्बी क्षेत्राच्या तुलनेत पेरा अजूनही जवळपास १४ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. रब्बीचे सरासरी क्षेत्र देशात ६३५ लाख ६० हजार हेक्टर आहे.  

Chana And Wheat
Wheat Stock Limit : गव्हाचे भाव कमी करण्यासाठी स्टॉक लिमिट सरकारने केली कमी

देशात गव्हाची पेरणी २९३ लाख हेक्टरवर झाली. गेल्यावर्षीपेक्षा गव्हाची पेरणी ३.१४ टक्क्यांनी आघाडीवर आहे.तर हरभरा पेरा ८६ लाख हेक्टरवर पोचला असून गेल्यावर्षीपेक्षा पेरा जवळपास २ टक्क्यांनी आघाडीवर आहे. तर भाताची पेरणी १२ लाख ७ हजार हेक्टरवर झाली असून गेल्यावर्षीपेक्षा जवळपास ६ टक्क्यांनी भारताची पेरणी आघाडीवर आहे. 

कडधान्य पेरा पिछाडीवर

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कडधान्याचा पेरा आघाडीवर होता. मात्र आता एकूण कडधान्याचा पेरा पिछाडीवर आला आहे. १६ डिसेंबरपर्यंत १२३ लाख २७ हजार हेक्टरवर लागवड झाली. तर गेल्यावर्षी १२३ लाख ७१ हजार हेक्टरवर पेरा झाला होता. कडधान्यात हरभरा पेरा आघाडीवर आहे. मात्र मसूर, उडीद, मुगाचा पेरा कमी झाला आहे. 

Chana And Wheat
Chana Sowing : रब्बीत हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्रात मोठी वाढ

भरडधान्य पेरणी कमी

चालू रब्बी हंगामात भडधान्याचा एकूण पेरा पिछाडीवर आहे. देशात आतापर्यंत ३८ लाख ७५ हजार हेक्टर भरडधान्याचा पेरा झाला. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत ४० लाख ४५ हजार हेक्टरवर पेरा झाला होता. म्हणजेच यंदा आतापर्यंत भरडधान्याचा पेरा ४.२० टक्क्यांनी पिछाडीवर आहे. भरडधान्यामध्ये ज्वारी, रागी, बाजरी, बार्ली पिकांची पेरणी कमी झाली. तर मक्याची पेरणी वाढली आहे. ज्वारीचा पेरा १ टक्क्याने कमी होऊन जवळपास २० लाख हेक्टरवर पोचला. तर मक्याची लागवड जवळपास अर्ध्या टक्क्याने वाढून १२ लाख १० हजार हेक्टरवर पोचली. 

तेलबिया पेरा साडेपाच  टक्क्यांनी माघारली

देशात यंदाच्या खरिपात तेलबिया पिकांचा पेरा ५.५२ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. १६ डिसेंबरपर्यंत रब्बी तेलबिया पिकांचा पेरा ९१ लाख ६० हजार हेक्टरवर झाला होता. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत ९६ लाख ९६ हजार हेक्टरवर पेरा झाला होता. मोहरीची लागवड ५.३५ टक्क्यांनी कमी होऊन ८५ लाख ५६ हजार हेक्टरवर झाली. भूईमुगाची लागवडही जवळपास ७ टक्क्यांनी कमी होऊन २ लाख ६२ हजार हेक्टरवर पोचली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com