Onion Export : कांदानिर्यात शुल्क कमी करण्यासाठी केंद्राला प्रस्ताव द्या

महाराष्ट्रासारखे प्रमुख कांदा उत्पादक राज्याला निर्यात शुल्काचा दर जास्त असल्यामुळे निर्यातीला मर्यादा येत आहेत. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक अडचणीत आला आहे.
Onion Export
Onion ExportAgrowon
Published on
Updated on

मुंबई ः ‘महाराष्ट्रासारखे प्रमुख कांदा उत्पादक (Onion Producer Maharashtra) राज्याला निर्यात शुल्काचा (Onion Export Duty) दर जास्त असल्यामुळे निर्यातीला मर्यादा (Limitation For Export) येत आहेत. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक अडचणीत आला आहे. मागील वर्षी ६८ टक्क्यांवर असणारी कांद्याची निर्यात (Onion Export) यावर्षी अवघी ८ टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्यात शुल्क कमी करण्याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

Onion Export
Onion Seed Rate : बियाण्याच्या चढ्या दरांचा फटका

या बाबत पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. तातडीने हा प्रस्ताव मंजूर करून घ्यावा, अशी मागणी त्याद्वारे करण्यात आली आहे.

पत्रात म्हटले आहे की, राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव तातडीने केंद्र सरकारकडे पाठविणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव राज्य सरकारकडून अद्यापही प्राप्त झाला नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. राज्यातील

Onion Export
Onion Export : पाकिस्तानला कांदा, टोमॅटो निर्यात सुरु करा

कांदा उत्पादकांना योग्य दर मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करावा व तो मंजूर करून घ्यावा, असेही पत्रात नमूद आहे.

निर्यात यंदा अवघ्या ८ टक्क्यांवर

पत्रात म्हटले आहे, की महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतात, कांद्याला योग्य दर मिळाला तर शेतकऱ्यांना कांद्याचे उत्पादन परवडते. मात्र कांद्यावरील निर्यात शुल्काचा दर जास्त असल्यामुळे कांदा निर्यातीला मर्यादा येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. निर्यात शुल्काचा दर जास्त असल्यामुळे कांदा निर्यातीचे प्रमाण घटले आहे. मागील वर्षी ६८ टक्के असणारे निर्यातीचे प्रमाण या वर्षी अवघ्या ८ टक्क्यांवर आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com