Sugar Production : साखर उत्पादन घटीचा अंदाज घाईचा

यंदा साखर उत्पादन कमी होणार हा काही तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज घाईचा आहे, असा खुलासा राष्ट्र्ीय सहकारी साखर कारखाना महासंघाने पत्रकाद्वारे केला आहे.
Sugar Production
Sugar ProductionAgrowon

कोल्हापूर ः यंदा साखर उत्पादन (Sugar Production) कमी होणार हा काही तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज घाईचा आहे, असा खुलासा राष्ट्र्ीय सहकारी साखर कारखाना महासंघाने पत्रकाद्वारे केला आहे. राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे (Prakash Naiknavare) यांनी या बाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

Sugar Production
Siddheshwar Sugar Factory : कारखान्याच्या चिमणीचा विषय सोडवा

यात म्हटले आहे, की देशभरातील ४३९ साखर कारखान्यांमध्ये नव्या ऊस गाळप हंगामाची जोमाने सुरुवात झाली आहे. ३० नोव्हेंबरअखेर ५९२ लाख टन उसाचे गाळप झाले असून, ४८.३५ लाख टन नवे साखर उत्पादन झाले आहे.

Sugar Production
Sugar Factory : ‘अजिंक्यतारा’चा पहिला हप्ता २८०० रुपये खात्यावर जमा

गतवर्षीच्या याच तारखेची तुलना करता ऊस गाळप जवळपास ८९ लाख टन (+१७.६७ टक्के) जास्त झाले असून साखरेचे उत्पादनदेखील २.९० लाख टनांनी (+६.३८ टक्के) अधिकचे झाले; मात्र सरासरी साखर उतारा ८.१२ टक्के नोंदला गेला असून, जो गेल्या वर्षीच्या या तारखेच्या उताऱ्यापेक्षा १ टक्क्याने कमी आहे.

Sugar Production
Sugar Export : ‘कोटा अदलाबदल’अंतर्गत ६ लाख ९५ हजार टनांचे करार

कांही वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केलेल्या ७ टक्के साखर उत्पादन कमी होणार असल्याच्या वृत्तामुळे देशातीलच नव्हे तर जागतिक साखर क्षेत्रात खळबळ माजली. देशभरातील गाळप हंगाम परतीच्या पावसामुळे दोन ते तीन आठवड्याने उशिरा सुरू झाला.

त्यातच केंद्र शासनाचे नवे साखर निर्यात धोरण जाहीर होण्यात एक महिना उशीर झाला. त्यासोबतच हंगामाच्या सुरुवातीला पडलेली कडाक्याची थंडी नंतरच्या काळात गायब झाली. यामुळे काही तज्ज्ञांनी घाईत भारतातील साखर उत्पादनात घटीचा अंदाज व्यक्त केलेला दिसतो. हंगाम किमान ६० दिवस पूर्ण झाल्याशिवाय ऊस व साखर उत्पादनाचा अंदाज वर्तविता येत नाही.

शिल्लक साठा केवळ १० लाख टनांनी जास्त

हंगामाच्या सुरुवातीची शिल्लक ६१.५३ लाख टन, इथेनॉलकडे वळविली जाणारी ४५ लाख टन साखर, २७५ लाख टन स्थानिक खप आणि अंदाजित ७५ लाख टनांची साखर निर्यात लक्षात घेता ३० सप्टेंबर २०२३ मध्ये संपणाऱ्या हंगाम २०२२-२३ चा शिल्लक साठा ७१.५३ लाख टन राहण्याचा अंदाज आहे, जो गतवर्षीपेक्षा फक्त १० लाख टनांनी ज्यास्तीचा असण्याचे अनुमानित आहे. त्यामुळे साखरेच्या स्थानिक बाजारातील कारखानास्तरावरील विक्री दरात तसेच किरकोळ ग्राहकस्तरावरील खरेदीदरावर फारसा विपरित परिणाम संभवत नाही, असे महासंघाने पत्रकात म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com