Sugar Factory : ‘अजिंक्यतारा’चा पहिला हप्ता २८०० रुपये खात्यावर जमा

मार्गदर्शक संचालक शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती
Sugar Factory
Sugar Factory Agrowon
Published on
Updated on

सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा (Sugar Factory) गळीत हंगाम (Crushing Season) जोमाने सुरू असून, या हंगामात आजअखेर गाळप झालेल्या उसाला प्रतिटन २८०० रुपये पहिला हप्ता देण्यात आला आहे. २८०० रुपये याप्रमाणे होणारी सर्व रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

Sugar Factory
Sugar Mill : ‘अजिंक्यतारा’ कडून १४१ रुपयांचा शेवटा हप्ता जमा

कारखान्याचा ३९ वा गळीत हंगाम १४ नोव्हेंबरपासून सुरू झाला असून, सात डिसेंबरअखेर ९७ हजार ०४० टन उसाचे गाळप झाले आहे. या गाळप झालेल्या उसाला पहिला हप्ता म्हणून २८०० रुपये प्रतिटन याप्रमाणे एकूण सात कोटी ३७ लाख ६६ हजार ३५८ एवढी रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा करण्यात आली आहे. चालू वर्षी कारखान्याचे विस्तारीकरण झाले असून, प्रतिदिन पाच हजार टन क्षमतेने गाळप सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उच्चतम ऊसदर देण्याची परंपरा कायम ठेवणार असून, उर्वरित पेमेंटसुद्धा वेळेत अदा करण्यात येईल, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

Sugar Factory
Dwarkadhish Sugar Factory : द्वारकाधीश कारखाना देणार २५०० रुपयांचा पहिला हप्ता

कारखान्याचा गळीत हंगाम सक्षमपणे सुरू असून, चालू गळीत हंगामात नऊ लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणा नियोजनबद्धरीत्या काम करीत असून, गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे या हंगामातही अजिंक्यतारा कारखाना गाळपास येणाऱ्या उसाला उच्चतम दर देण्यास कटिबद्ध आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com