Siddheshwar Sugar Factory : कारखान्याच्या चिमणीचा विषय सोडवा

अन्यथा आत्महत्या; सभासद, शेतकऱ्यांचा इशारा; आंदोलनामुळे अक्कलकोट रस्त्यावर कोंडी
Siddheshwar Sugar Factory
Siddheshwar Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

सोलापूर : बोरामणी (Boramani) येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून शेतकरी, कामगारांची रोजीरोटी असलेल्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (Shri Siddheshwar Co-operative Sugar Factory) चिमणीचा विषय कायमचा मिटवावा, अन्यथा सामूहिक आत्महत्या करू, त्यानंतर उद्भवणाऱ्‍या परिस्थितीची जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील, असा इशारा बुधवारी (ता. ७) सभासद शेतकरी, कामगारांनी दिला.

Siddheshwar Sugar Factory
Sugarcane Crushing : सिद्धेश्‍वर कारखान्याच्या गाळपाला परवानगी नको

सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर कुंभारी टोल नाका येथे दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती अप्पासाहेब बिराजदार व कारखान्याचे संचालक अ‍ॅड. शिवशंकर बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी बोलताना संतप्त झालेल्या शेतकरी, कामगारांनी आपली भाकरी वाचविण्याची आर्त हाक दिली. आपल्या अन्नात कुणी विष कालवत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही, असा दमही शेतकऱ्यानी यावेळी भरला. दरम्यान, या आंदोलनामुळे सुमारे अर्धा तास सोलापूर-अक्कलकोट वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजुला वाहने थांबली होती.

Siddheshwar Sugar Factory
Farmer Producer Company : कायद्याच्या कचाट्यातून सोडवा’

या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते, अ‍ॅड. दीपक आलुरे, शिवानंद पाटील, अरुण लातुरे, गुरूराज माळगे, अमर पाटील, शंकर पाटील, सुरेश झळकी, विद्यासागर मुलगे, महादेव जम्मा, अप्पासाहेब पाटील, राजशेखर पाटील, लक्ष्मण झळकी, सुरेश झळकी, विलास पाटील, शिवानंद पाटील, श्री सिध्देश्वर कामगार युनियनचे सरचिटणीस अशोक बिराजदार, किरण आरळीकर, शिवानंद जवळे, विजयकुमार करजोळे, शिवानंद चांगले यांच्यासह रोहित बिराजदार, सूरज पाटील, भाजपचे नेते रामचंद्र होनराव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बिपीन करजोळे, जी.जी.बिराजदार,

अ‍ॅड. अरुण बिराजदार, मल्लिनाथ बिराजदार, मल्लिनाथ करजोळे, भूताळी कळकिळे, अप्पू थ्वंटे, मल्लिनाथ पारशेट्टी, अंबण्णा बन्ने, शिवानंद झगळघंटे, गेनसिध्द गुंडे, प्रकाश करपे, धीरज छपेकर, भीमाशंकर माळी, शब्बीर जमादार, विजयकुमार शाबासे, औदुसिध्द आमसे, राजशेखर मुलकीपाटील, शिवानंद बिराजदार, सोमनिंग इसरगुंडे, शिवानंद माळी, मळसिध्द गुंडे, बाबू गुंडे, अप्पू कटारे, संजीव इसरगुंडे, विलास छपेकर, इरप्पा कारंजे, चंद्रकांत मडिवाळ आदी कुंभारी, कर्देहळ्ळी, तोगराळी, शिर्पनहळ्ळी, दर्गनहळ्ळी, वडगाव, लिंबीचिंचोळी, यत्नाळ, धोत्री येथील शेतकरी सभासद, कामगार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वळसंग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांना सभासदांनी मागण्यांचे निवेदन दिले. संचालक अ‍ॅड.शिवशंकर बिराजदार यांनी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com