Green Pea Sowing : पुरंदरमधील शेतकऱ्यांचा वाटाणा पिकांकडे कल

Kharif Sowing : पुरंदर तालुक्यातील शेतकरी पीक बदल करू लागले असून, अनेक शेतकरी खरिपातील वाटाणा पिकांकडे वळाले आहेत.
Green Pea
Green PeaAgrowon
Published on
Updated on

Pune News : पुरंदर तालुक्यातील शेतकरी पीक बदल करू लागले असून, अनेक शेतकरी खरिपातील वाटाणा पिकांकडे वळाले आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेला वाटाणा सध्या जोमदार आला आहे.

यंदा पावसाचे प्रमाण कमी असून देखील बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने वाटाण्याचे पीक घेतले आहे. त्यामुळे तालुक्यात तब्बल २ हजार २४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. चालू वर्षी वाटाण्याचे मोठे उत्पादन मिळून बाजार भावदेखील चांगला मिळेल, असा अंदाज उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बाजारात ग्राहकांची पहिली पसंत असलेला आणि सर्वाधिक मागणी म्हणून पुरंदरचा वाटाणा ओळखला जातो. म्हणूनच शेतकरी किंवा व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी पुरंदरचा वाटाणा म्हटले की ग्राहक कोणत्याही किमतीत खरेदी करण्यासाठी तयार असतात. पुरंदर तालुक्यात एकाच हंगामात दोन ते तीन महिन्यांत दर वर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.

तालुक्यातील पूर्व भागातील वाघापूर, राजेवाडी, आंबळे, टेकवडी, माळशिरस, पोंढे या गावांत तालुक्यात एकाच हंगामात दर वर्षी कोट्यवधींची उलाढाल होते. वाटाणा परिपक्व होण्यास अजून मोठा काळ बाकी आहे. मात्र, आताच बाजारात वाटाणा खरेदी करणारे व्यापारी सक्रिय झाले आहेत.

Green Pea
Kharif Sowing : उडदाची जवळपास दीड पट पेरणी

खरीप हंगामात वाटाण्याच्या खरेदी-विक्रीतून मोठी उलाढाल होत असते. वाटाणा हे केवळ दीड ते दोन महिन्यांत लाखोंचे उत्पन्न देणारे पीक आहे, असे आंबळे येथील प्रगतिशील शेतकरी योगेश काळे यांनी सांगितले.

ही गावे आहेत प्रसिद्ध

सासवड, गराडे, कोडीद, हिवरे, बोपगाव, चांबळी, सुपे, दिवे, काळेवाडी, वाघापूर, राजेवाडी, आंबळे, टेकवडी, माळशिरस, पोंढे

Green Pea
Kharif Sowing : दमदार पावसामुळे खरीप पेरा ८२ टक्क्यांपर्यंत

कमी खर्चातील पीक

वाटाणा हे तरकारी वर्गातील पीक प्रसिद्ध आहे. कमी पाण्यावर आणि कमी वेळेत तोडणीस पीक असून कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून प्रसिद्ध आहे. अत्यंत गोड चव, शेंगांचा विशिष्ट आकार आणि शेंगांच्या आतील दाण्यांची संख्या जास्त असल्याने पुरंदरच्या वाटाण्याला महाराष्ट्रासह देशाच्या विविध बाजारपेठेत विशेष मागणी असते. तसेच दरही चांगला मिळत असून केवळ ४५ ते ५० दिवसांत तोडणीस येत असल्याने शेतकऱ्यांची वाटाणा पिकाला विशेष पसंती असते.

थंडीच्या दिवसांत मोठी आवक

पश्चिम महाराष्ट्रात पुरंदर, पारनेर हे तालुके वाटाणा पिकासाठी ओळखले जातात. साधारणपणे उत्पादन सुरू झाल्यानंतर सातत्याने सात ते दहा दिवसांच्या फरकाने काढणी करावी लागते. या कालावधीत एकरी जवळपास ३ ते ४ टन उत्पादन होते. त्यामुळे उत्पादित झालेल्या वाटाण्याची शेतकरी जवळच्या मार्केटमध्ये विक्री करतात.

माझ्याकडे नऊ एकर शेती आहे. त्यामध्ये अंजीर, सीताफळ, पेरू, वाटाणा अशी विविध पिके घेतो. यंदा खरिपात वाटाण्याची पेरणी केली नसली तरी रब्बीत पेरणी करणार आहे. गेल्या वर्षी पाऊण एकरावर वाटाण्याची नोव्हेंबरमध्ये पेरणी केली होती. त्यासाठी गोल्डन वाणाची निवड केली होती. पेरणी केल्यानंतर पावणे दोन महिन्यानंतर उत्पादन सुरू होते. त्यासाठी थंड वातावरण आवश्यक असून पाण्यासाठी स्प्रिंक्लरचा वापर केला होता. दर वर्षी एकरी दोन ते अडीच टन वाटाण्याचे उत्पादन होते. गावापासून पुणे मार्केटजवळ असल्याने येथेच मालाची विक्री करण्यावर भर देतो. बाजारात किलोला ३० ते १५० रुपयांपर्यंत दर मिळतो.
- कैलास झेंडे, वाटाणा उत्पादक शेतकरी, दिवे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com