Onion Storage Rot : चाळीस टक्के कांद्याची चाळीतच नासाडी

Onion Rate Crisis : उन्हाळ कांदा काढणीच्या काळातच जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काढणीला आलेला तसेच काढणी केलेला कांदा भिजला होता. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.
Onion Damage
Onion DamageAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : उन्हाळ कांदा काढणीच्या काळातच जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काढणीला आलेला तसेच काढणी केलेला कांदा भिजला होता. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. चाळीत साठविलेला कांदा सडू लागला आहे.

आतापर्यंत तीस ते पस्तीस टक्के कांद्याची नासाडी झाल्याचे दिसत आहे. त्यात कांद्याची विक्री करावी तर दर नाही त्यामुळे उत्पादक शेतकरी दुहेरी कोंडीत सापडले आहेत. महाराष्ट्रामध्ये अंदाजे १.५ लाख हेक्टर क्षेत्र कांद्याच्या लागवडीखाली आहे.

Onion Damage
Onion Cultivation : लेट खरीप कांदा लागवडीची खानदेशात तयारी

राज्यात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सर्वाधिक कांद्याचे उत्पादन नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये आहे. मराठवाडा, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, विदर्भातही आता कांद्याचे क्षेत्र वाढत आहे. राज्यात वर्षाला ९० लाख ते ११० लाख टनांपेक्षा अधिक उत्पादन होते.

राज्यात खरिपात ३० टक्के तर रब्बी-उन्हाळी कांद्याचे क्षेत्र ७० टक्के असते. यंदा राज्यातील बहुतांश भागात एप्रिल, मे महिन्यांत पूर्वमोसमी पाऊस झाला. कांदा उत्पादकांना या पावसाचा मोठा फटका बसला. उन्हाळ कांद्याची एप्रिल-मे महिन्यात काढणी सुरू असते. बहुतांश शेतकऱ्यांचा काढणी केलेला कांदा भिजला. शिवाय अधिक काळ पाऊस सुरू राहिल्याने त्या वातावरणाचाही फटका कांद्याला बसला आहे.

एप्रिल, मे महिन्यांत कांद्याला पुरेसा दर मिळत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा चाळीस साठवून ठेवला. मात्र यंदा कांद्याची टिकवण क्षमता कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा दोन महिन्यांतच कांदा चाळीतच सडू लागला आहे.

Onion Damage
NCCF Onion Procurement : ‘एनसीसीएफ’कडूनही माहिती देण्यास टाळाटाळ

आतापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांचा चाळीस टक्क्यांपर्यंत कांदा चाळीतच सडला असल्याचे अतुल तांबे या शेतकऱ्याने सांगितले. त्यातच कांदा दरातही फारशी वाढ होताना दिसत नाही. सध्या १८०० रुपयांच्या आत आणि सरासरी ९०० रुपयांपर्यंतच प्रति क्विंटलला दर मिळत आहे. मात्र हा दर उत्पादन खर्च निघणाराही नाही, त्यामुळे उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत.

मी या वर्षी अडीच एकर उन्हाळी कांदा लागवड केली होती. मात्र चाळीतच पन्नास टक्के कांद्याची नासाडी झाल्याने शेतात फेकून दिला. राहिलेल्या कांद्यालाही पुरेसा दर मिळाला नाही. त्यामुळे कांद्याचा उत्पादन खर्चही निघाला नाही. सर्वच भागातील कांदा उत्पादक शेतकरी यंदा प्रचंड तोट्यात आहेत. सरकारने कांदा उत्पादकाला मदत करण्याची गरज आहे.
- विक्रम गायकवाड, कांदा उत्पादक शेतकरी, आश्वी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com