Onion Farming
Onion FarmingAgrowon

Onion Cultivation : लेट खरीप कांदा लागवडीची खानदेशात तयारी

Onion Plantation : मध्यंतरी कांदा बियाणे दरवाढ सुरूच राहिली किंवा बियाणे अधिक दरात शेतकऱ्यांना घ्यावे लागेल, अशी स्थिती होती. परंतु कमी पावसाने कांदा लागवडीबाबत भीतीचे वातावरण आहे.
Published on

Dhule News : खानदेशात खरिपातील लेट किंवा उशिराचा कांदा लागवडीची तयारी शेतकरी करीत आहेत. त्यासाठी कांदा रोपवाटिका तयार केल्या जात असून, कांदा बियाण्याचे दर स्थिरावल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळत आहे.

मध्यंतरी कांदा बियाणे दरवाढ सुरूच राहिली किंवा बियाणे अधिक दरात शेतकऱ्यांना घ्यावे लागेल, अशी स्थिती होती. परंतु कमी पावसाने कांदा लागवडीबाबत भीतीचे वातावरण आहे. कमी व अनियमित पावसाने अनेकांनी रोपवाटिका तयार करणे टाळले.

Onion Farming
Paddy Plantation : पालघर जिल्ह्यामध्ये भात लावणी अंतिम टप्प्यात

आता उशिराच्या लागवडीसाठी रोपवाटिकांमधील रोपे तगण्याची स्थिती चांगली किंवा समाधानकारक राहील, असा विश्‍वास शेतकऱ्यांना आहे. त्यासाठी रोपवाटिका तयार करण्याची तयारी सुरू आहे. काही भागात या रोपवाटिका तयारही झाल्या आहेत. कमी पावसाने कांदा बियाणे बाजारातील तेजीही कमी होत आहे. ग्रामीण भागात अनेक शेतकरी दर्जेदार बियाण्याची विक्री करीत आहेत.

कमी पावसाची चिंता

लेट खरिपात कांदा पिकास सिंचनाची गरज भासते. पण पाऊस कमी आहे. यामुळे कांदा लागवडीवर परिणामही काही भागात झाला आहे. पाऊस आल्यास पुढे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

कांद्याची लागवड धुळे जिल्ह्यात अधिक होईल. लेट खरीप कांदा लागवड साक्री, शिंदखेडा भागात अधिक असणार आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जामनेर, पाचोरा आदी भागांत लागवड होईल, अशी स्थिती आहे.

Onion Farming
Onion Plantation : सरासरीच्या तुलनेत खरीप कांदा लागवडी निम्म्यावर

बियाणे आवाक्यात

धुळ्यात शिंदखेडा, शिरपूर, जळगाव जिल्ह्यात जळगाव, एरंडोल, धरणगाव, रावेर, चोपडा आदी भागांत अनेक कांदा बियाणे विक्रेते शेतकरी आहेत. ५००, ९०० ते १००० आणि १२०० रुपये प्रति किलो या दरात बियाण्याची विक्री ही मंडळी करीत आहे. यंदा रोपवाटिकांची संख्याही कमी आहे.

यातच अनेक शेतकरी लेट खरीप कांदा पिकाकडे वळत असल्याची स्थिती आहे. पुढे लागवडही वाढेल, असा अंदाज आहे. यामुळे कांदा बियाण्यात तेजी येईल, असे दिसत होते. यातच जूनच्या सुरुवातीला प्रतिकूल वातावरण होते.

उष्णता, उष्ण वारे, मध्येच कमी अधिक पाऊस, अशी स्थिती होती. यात बियाण्याची उगवण व्यवस्थित होईल की नाही, अशी भीतीही होती. परंतु शेतकऱ्यांनी उत्तम व्यवस्थापन करून रोपवाटिकांमध्ये बियाण्याची उगवणक्षमता टिकविली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com