Agriculture Commodity Market : हळद, तूर, कांद्याच्या किमतीत घट

Cotton Rate : या सप्ताहात MCX तर्फे दोन चांगल्या वार्ता जाहीर करण्यात आल्या. एक म्हणजे, कापसाचे नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी डिलिव्हरी व्यवहार जुलै महिन्यात, फेब्रुवारी डिलिव्हरी व्यवहार ऑगस्ट महिन्यात व मार्च डिलिव्हरी व्यवहार सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहेत.
Agriculture Commodity Market
Agriculture Commodity Market Agrowon
Published on
Updated on

फ्यूचर्स किमती ः सप्ताह १४ ते २० जून २०२५

१ जून ते २० जून दरम्यान देशातील पाऊस सरासरीपेक्षा फक्त १ टक्क्याने कमी झाला आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात पाऊस ३७ ते ३८ टक्क्यांनी अधिक होता; मराठवाडा व विदर्भात मात्र अनुक्रमे ३९ व ५७ टक्के पाऊस कमी पडला.

या सप्ताहात MCX तर्फे दोन चांगल्या वार्ता जाहीर करण्यात आल्या. एक म्हणजे, कापसाचे नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी डिलिव्हरी व्यवहार जुलै महिन्यात, फेब्रुवारी डिलिव्हरी व्यवहार ऑगस्ट महिन्यात व मार्च डिलिव्हरी व्यवहार सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहेत. थोडक्यात, या वर्षासाठी फ्यूचर्स मार्केटचा फायदा शेतकऱ्यांना संपूर्ण हंगामासाठी मिळणार आहे. दुसरी वार्ता म्हणजे हे सर्व नवीन व्यवहार आता खंडी (candy)मध्ये न होता पूर्वापार ओळखीच्या ‘गाठी’मध्ये (bales) होणार आहेत.

प्रत्येक गाठीमध्ये १८० किलो कापूस असेल. किमतीची बोलीसुद्धा गाठीसाठी असेल. डिलिव्हरी युनिट १०० गाठी असतील. कापूस लांब धाग्याचा (९ मिमी) असेल. MCX मधील कापसाचे व्यवहार बरेच अॅक्टिव आहेत; या वर्षी एकूणच जागतिक बाजार अस्थिर स्वरूपाचे राहणार आहेत. योग्य वेळ साधली व फ्यूचर्स व्यवहार केले, तर हमीभावापेक्षा अधिक भाव मिळण्याची शक्यता आहे. आतापासून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या व्यवहारांची माहिती घ्यावी व फ्यूचर्स भावांवर लक्ष ठेवावे.

या सप्ताहात हळद व तूर यांचे भाव कमी झाले. कांदा व टोमॅटो यांचे भावसुद्धा घसरले. इतर पिकांचे भाव वाढले. मका व मूग यांची आवक वाढत्या प्रमाणावर आहे.

२० जून २०२५ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) या सप्ताहात ०.२ टक्क्याने वाढून रु. ५४,२४० वर आले आहेत. जुलै फ्यूचर्स भाव सुद्धा ०.१ टक्क्याने वाढून रु. ५३,२१० वर आले आहेत. सप्टेंबर भाव रु. ५६,००० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३.२ टक्क्यांनी अधिक आहेत. अमेरिकेतील कापसाचे भाव या सप्ताहात १.५ टक्क्याने घसरले.

NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) गेल्या सप्ताहात रु. १,५३९ वर आले होते. या सप्ताहात ते ०.४ टक्क्याने वाढून रु. १,५४५ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स ०.३ टक्क्याने वाढून रु. १,५८६ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा २.७ टक्के अधिक आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५८८ वर आले आहेत.

कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,७१० व लांब धाग्यासाठी रु. ८११० आहेत. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. अमेरिकेतील कापसाचे भाव या सप्ताहात १.५ टक्क्याने घसरले.

Agriculture Commodity Market
Maize Seed : मका बियाणे अनियंत्रित किमतीचा प्रश्न गंभीर

मका

NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (गुलाबबाग) गेल्या सप्ताहात रु. २,२३० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. २,२७५ वर आल्या आहेत. जुलै फ्यूचर्स किमती रु. २,२६९ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स रु. २,३०४ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव १.३ टक्क्याने अधिक आहे. मक्याचा हमीभाव रु. २,४०० आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा कमी आहेत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात ०.६ टक्के घसरून रु. १४,४७१ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा १.१ टक्क्याने घसरून रु. १४,३१५ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती ३.१ टक्क्यांनी घसरून रु. १४,२६४ वर आल्या आहेत. ऑक्टोबर किमती रु. १४,४९६ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.३ टक्क्याने अधिक आहेत. सांगलीमधील (राजापुरी) स्पॉट भाव १.५ टक्क्याने घसरून रु. १५,८७२ वर आला आहे.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ५,६७५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी वाढून रु. ५,८०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० जाहीर झाला आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) १.९ टक्क्याने वाढून रु. ७,३१३ वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,७६८ आहे. सध्याचा भाव हमीभावापेक्षा बराच कमी आहे. नवीन पिकाची आवक वाढती आहे.

Agriculture Commodity Market
Soybean Seed : बाजारात मागणी असलेल्या सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) रु. ४,३९४ वर आली होती. या सप्ताहात ती १.१ टक्क्याने वाढून रु. ४,४४४ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ५,३२८ आहे. नवीन पिकाची आवक आता कमी होऊ लागली आहे. हमीभावापेक्षा बाजारभाव कमी आहे. अमेरिकेतील सोयाबीनचे भाव या सप्ताहात ०.२ टक्क्याने कमी झाले.

तूर

गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) रु. ६,५६१ वर आली होती. या सप्ताहात ती ०.१ टक्क्याने घसरून रु. ६,५५३ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ८,००० आहे. आवक कमी होऊ लागली आहे. सध्याचा भाव हमीभावापेक्षा कमी आहे.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत या सप्ताहात घसरून रु. १,५८८ वर आली आहे. कांद्याची आवक पुन्हा वाढलेली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,७०० वर आली होती; या सप्ताहात ती वाढत्या आवकेमुळे रु. १,५०० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com