Soybean Seed : बाजारात मागणी असलेल्या सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा

Seed Shortage : गेल्या तीन वर्षांपासून तोटा झाल्याने यंदा सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांनी उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे बियाणे बाजारात सोयाबीनच्या वाणांची टंचाई आहे.
Soybean Shortage
Soybean ShortageAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : गेल्या तीन वर्षांपासून तोटा झाल्याने यंदा सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांनी उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे बियाणे बाजारात सोयाबीनच्या वाणांची टंचाई आहे. यंदा घरगुती बियाण्यांचा वापर वाढणार असून उत्पादनाच्या सरासरीबाबत कृषी तज्ज्ञांनी संशय व्यक्त केला आहे. टंचाईमुळे यंदा सोयाबीनचा बाजार लवकरच उठला आहे.

पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या असल्या तरी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करण्याची घाई केली आहे. खरिपातील मुख्य पिकांपैकी सोयाबीनच्या वाणांची बियाणे बाजारात टंचाई असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन वर्षांपासून सोयाबीनचे बियाणे पुरवठ्याच्या तुलनेत कमी प्रमाणात विक्री झाले आहे.

Soybean Shortage
HTBT Cotton Seed : कपाशीचे एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी जिंतूर तालुक्यात गुन्हा

विक्रेत्यांनी उत्पादक कंपनीकडे बुकिंग केलेल्या बियाण्यांपैकी पन्नास टक्के बियाणे शिल्लक राहिले. नाइलाजाने हे बियाणे खुल्या बाजारात कमी दराने विक्री करण्याची वेळ कृषी विक्रेत्यांवर आली. त्यांनी यंदा हा अनुभव लक्षात घेत कंपन्यांकडे बुकिंग कमी प्रमाणात केले. त्यामुळे साहजिकच उत्पादनही कमी झाले व बाजारात पुरवठा कमी झाल्याने आता मागणी असली तरी बियाण्यांची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे.

मागणीइतका पुरवठा नाही

खरीप हंगाम २०२५ साठी कृषी विभागाने २.६३ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी अंदाजित करून बियाण्यांचे नियोजन केले. यामध्ये ३५ टक्के बदल गृहीत धरून ७० हजार २९७ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली.

Soybean Shortage
HTBT Seed Fraud: ‘एचटीबीटी’आड बाजारात एफ-२ बियाण्यांची विक्री

महाबीजकडून ३२ हजार व सार्वजनिक क्षेत्रातून ३८ हजार २९७ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा होणार होता. प्रत्यक्षात महाबीजने ३० हजार क्विंटलचाच पुरवठा केला आहे. तर सार्वजनिक क्षेत्रातून एकूण मागणीच्या तीस टक्के पुरवठा कमी झाला असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षांत सोयाबीन बियाण्यांच्या विक्रीत तोटा सहन करावा लागला आहे. घरगुती बियाण्यांचा वापर वाढल्याचा हा परिणाम असावा, असे वाटते. गतवर्षी ८० ते ९० रुपये किलोचे बियाणे ४० रुपये किलोने खुल्या बाजारात विकावे लागले. यंदा हा अनुभव लक्षात घेता बुकिंग कमी केले आहे. त्यामुळे कंपनीनेही उत्पादन कमी केल्याने तुटवडा आहे.
-प्रवीण उंबरकर, गायत्री कृषी सेवा केंद्र.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com