Palm Oil Export : इंडोनेशिया वाढविणार पाम तेलाची निर्यात

इंडोनेशिया पामतेल आयात वाढविण्याच्या विचारात आहे. त्याच कारणामुळे चीनदेखील इंडोनेशियातून मोठ्या प्रमाणावर पाम तेल आयातीचा विचार करीत आहे.
Palm Oil Export
Palm Oil ExportAgrowon
Published on
Updated on

नागपूर ः इंडोनेशियाने मोठ्या प्रमाणावर पामतेल आयातीचा निर्णय (Palm Oil Import) घेतला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात खाद्यतेल (Edible Oil Sector) क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात मंदीचे सावट निर्माण झाले असून, त्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

Palm Oil Export
Palm oil: पामतेलाचे दर वाढतील का?

इंडोनेशिया पामतेल आयात वाढविण्याच्या विचारात आहे. त्याच कारणामुळे चीनदेखील इंडोनेशियातून मोठ्या प्रमाणावर पाम तेल आयातीचा विचार करीत आहे. रविवारपर्यंत (ता. ३१) इंडोनेशियाने ३८.४ लाख टन पाम तेल निर्यातीला मंजुरी दिली आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मंदीचे सावट आहे. भारतीय बाजार व उद्योगक्षेत्रदेखील यामुळे प्रभावित झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पाम तेलाच्या दरात घसरण झाल्याच्या संधीचा फायदा घेत भारतीय व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पाम तेलाच्या आयातीसंदर्भात सौदे केले आहेत. परिणमी, येत्या सण-उत्सवाच्या काळात खाद्यतेल बऱ्याचअंशी ग्राहकांच्या आवाक्‍यात राहण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

Palm Oil Export
Palm Oil: देशात पामतेलाची आयात घटली

यंदा फेब्रुवारी ते जून या कालावधीत भारतात सूर्यफूल तेल आयात ५.६ लाख टन इतकीच मर्यादित झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ७.४ लाख टन आयात करण्यात आली होती. २०२१-२२ मधील आर्थिक वर्षात २०.४५ लाख टन कच्च्या (क्रूड) सूर्यफूल तेलाची आयात झाली. २०२०-२१ या आर्थिक वर्षात ती २१.७५ लाख टन इतकी होती, अशी माहिती कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनीच लोकसभेत एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली. मोहरी तेलाचे दर स्थिर असून, त्यात आणखी सुधारणांची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मोहरीचे दर राजस्थानात ६८००, तर देशातील अन्य बाजारात ७२५० रुपयांवर आहेत. १.९० लाख पोत्यांची आवक नोंदविण्यात आली आहे. मोहरीची खरेदी आणि विक्रीचे व्यवहार संथगतीने होत आहेत. त्यामुळे या जिनसाच्या दरात मोठे चढ-उतार तुर्तास तरी शक्‍य नसल्याचे सांगितले जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणखी मजबूत झाले आहे. दुसरीकडे भारतात कमी दराने सोयाबीन खरेदीसाठी व्यापारी उत्सुक असून, प्रक्रिया उद्योगांकडून देखील मागणी वाढली आहे. महाराष्ट्रातील काही प्रक्रिया उद्योगांकडून सोयाबीनची ६६०० रुपये क्विंटल दराने खरेदी करण्यात आली. मध्य प्रदेशात त्यापेक्षा १०० रुपये वाढीव दर मिळाला. त्यातच यंदा महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे या दोन्ही प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांत सोयाबीनचे नुकसान झाल्याने येत्या काळात सोयाबीन दरात २५० ते ३०० रुपयांची तेजी येण्याची शक्‍यता आहे; मात्र सोया तेलाची मोठ्या प्रमाणावर आयात झाल्याने सोयाबीन तेजीचा विशेष फरक सोया तेलाच्या दरावर पडणार नाही, असे जाणकार सांगतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com