Cotton Rate : कापूस दर आणखी वाढणार का?

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात आजही चढ-उतार पाहायला मिळाले. तर देशातील बाजारातही अनेक ठिकाणी कापूस दरात नरमाई दिसून आली. कापसाचे दर नरमल्यानंतर बाजारातली आवकही घटली.
Cotton Rate
Cotton RateAgrowon

सोयाबीनचे दर टिकून

1. देशातील सोयाबीन बाजारात आज संमिश्र चित्र होते. काही बाजारांमध्ये दर क्विंटलमागे ५० ते १०० रुपयाने सुधारले होते. तर काही ठिकाणी दर स्थिर असल्याचं दिसून आलं. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनचे दर काहीसे नरमले होते. मात्र सोयातेलाच्या दरात सुधारणा झाली. देशात आज सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळला. सध्या सोयाबीनच्या दरात चढउतार सुरु आहेत. मात्र यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Cotton Rate
Soybeans : नाफेडला सोयाबीन मिळणार नसल्याचे संकेत

काबुली हरभरा तेजीत

2. देशात सध्या काबुली हरभऱ्याचे दर तेजीत आहेत. काबुली हरभऱ्याचे उत्पादन मागील रब्बी हंगामात कमी झाले होते. त्यातच निर्यातही चांगली झाली. त्यामुळं काबुली हरभऱ्याचा देशात तुटवडा जाणवत आहे. तर देशात सध्या लग्न सराईचा हंगाम सुरु झाल्याने मागणी वाढली आहे. त्यामुळे काबुली हरभऱ्याला सध्या प्रतिक्विंटल १२ हजार ते १३ हजार ५०० रुपये दर मिळतोय. काबुली हरभऱ्याचे हे दर नवीन माल बाजारात येईपर्यंत टिकून राहू शकतात, असा अंदाज प्रक्रिया उद्योगांकडून व्यक्त केला जात आहे.

Cotton Rate
Onion Plant : भाऊ, दादा आम्हलेही कांदानं उळे मिळई का!

कांदा दर नरमले

3. देशातील बाजारात कांदा दर पुन्हा नरमले आहेत. मागील काही दिवसांपर्यंत कांद्याचा सरासरी भाव २ हजार रुपयांच्या दरम्यान होता. मात्र खरिपातील कांद्याची आवक वाढल्याचं सांगत बाजारात दर कमी केले आहेत. सध्या राज्यातील महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी १ हजार ३०० ते १ हजार ६०० रुपये दर मिळतोय. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. मात्र खरिपातील कांदा उत्पादन कमी राहण्याचा अंदाज अशल्यानं दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

Cotton Rate
Jowar Bajri Rate : बाजरीसह ज्वारीचे दर वधारले

ज्वारीचे दर वाढले

4. देशात यंदा परतीचा पाऊस लांबला होता. त्यामुळं ज्वारी पेरणीला उशीर होतोय. परिणामी अनेक भागात शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी गहू आणि हरभरा पिकाला पसंती दिल्याचं दिसतं. त्यामुळं यंदाच्या रब्बी हंगामात देशातील ज्वारी उत्पादन घटण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आत्तापासून देशातील ज्वारीच्या दरावर दिसतोय. त्यातच सध्या ज्वारीची आवक कमी आहे. त्यामुळं ज्वारीला सरासरी प्रतिक्विंटल ३ हजार ते ५ हजार रुपये दर मिळतोय, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

कापूस दर आणखी वाढणार का?

5. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर (Cotton Rate) तुटल्यानंतर त्याचा परिणाम देशातील बाजारदरावरही (Cotton Market) होत आहे. त्यातच कापसाचा मोठा ग्राहक असलेल्या चीनमध्ये पुन्हा कोरानाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळं येथील सरकार लगेच पूर्ण निर्बंध उठवण्याची शक्यता कमी आहे. म्हणजेच चीनचे मार्केट (China Cotton Market) पूर्णपणे लगेच खुले होण्याची शक्यता धुसर झाली. त्यामुळं चीनकडून कापसाला लगेच मागणी (Cotton Demand) वाढण्याचा अंदाज नाही. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसत असल्याचे जाणकारांचं म्हणणं आहे.

कापूस दराने आज नोव्हेंबरमधील सर्वात निचांकी पातळी गाठत ७९.७१ सेंट प्रतिपाउंडचा टप्पा गाठला होता. मात्र त्यानंतर कापूस दरात सुधारणा होत गेली. दुपारी ३ वाजेपर्यंत कापसाचे व्यवहार ८०.८८ सेंट प्रतिपाऊंडने झाले. मात्र देशात काही बाजारांमध्ये आजही कापसाचे दर काहीसे नरमले होते. आज कापसाला सरासरी ८ हजार ३०० ते ८ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मात्र कापसाचे दर कमी झाल्यानंतर बाजारातील आवकही कमी झाली आहे. शेतकरी या नरमलेल्या दरात कापूस विकण्यास इच्छूक दिसत नाहीत. जाणकारांच्या मते पुढील महिनाभर कापसाच्या दरात चढ-उतार होण्याचा अंदाज आहे. पण जानेवारी महिन्यापासून कापूस दर पुन्हा पूर्वपातळीवर येऊ शकतात. शेतकऱ्यांना सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने कापूस विक्री करणं गरजेचं आहे, असं आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलंय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com