टीम ॲग्रोवन
मुंबई कृषी उत्पन्न बाजार (Mumbai APMC) समितीमधील घाऊक बाजारात बाजरी व ज्वारीच्या दरात (Jowar Bajri Rate) वाढ झाली आहे.
बाजरीच्या दरात (Bajri Rate) गतवर्षीच्या तुलनेत आठ रुपयांनी तर ज्वारीचे दर (Jowar Rate) प्रतिकिलो सहा रुपयांनी वाढले आहेत.
सध्या गव्हाचे दर स्थिर आहेत. तांदळाचे दरही एक-दोन रुपयांनी वाढले आहेत. ज्वारी, बाजरीच्या दरात वाढ झाल्यामुळे भाकरी आता महागली आहे.
गतवर्षी बाजरीचे दर प्रतिकिलो २२ रुपये होते, मात्र यंदा दरात आठ ते १० रुपयांची वाढ झाली असून दर्जानुसार ३० रुपये किलोने विकली जात आहे.
सध्या बाजरीची आवक कमी असल्यामुळे दरात वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये नवीन माल येण्यास सुरुवात झाल्यानंतर बाजरीच्या दरात घसरण होईल, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.