गहू दरात तेजीराज्यातील प्रमुख बाजार समित्यांपैकी नागपूर बाजारात आज शरबती गव्हाची आवक कालच्या तुलनेत ६९२ क्विंटलने वाढून १ हजार क्विंटल झाली. सरासरी दरात ८०१ रुपयांची वाढ होऊन तो ३ हजार ४२५ रुपये प्रति क्विंटल झाला. तर,अकोला बाजारात स्थानिक गव्हाची आवक कालच्या तुलनेत ७६ क्विंटलने वाढून ५९२ क्विंटल झाली. सरासरी दरात ३५ रुपयांची वाढ होऊन तो २ हजार ५९० रुपये प्रति क्विंटल राहिला. तसेच, उल्हासनगर बाजारात स्थानिक गव्हाची आवक कालच्या तुलनेत १०० क्विंटलने वाढून ५६० क्विंटल झाली. मात्र, सरासरी दर ५० रुपयांनी घसरून ३ हजार २०० रुपये प्रति क्विंटल होता..कांदा बाजारात बदलपिंपळगाव बसवंत बाजारात आज उन्हाळी कांद्याची आवक कालच्या तुलनेत ८७६ क्विंटलने घटून २० हजार ४०० क्विंटल झाली. सरासरी दर १०० रुपयांनी घसरून २ हजार २५० रुपये प्रति क्विंटल झाला. तर, मालेगाव-मुंगसे बाजारात उन्हाळी कांद्याची आवक कालच्या तुलनेत १ हजार ७०८ क्विंटलने घटून १० हजार क्विंटल झाली. सरासरी दर ५७४ रुपयांनी वाढून १ हजार ८५० रुपये प्रति क्विंटल झाला. तसेच, लासलगाव-विंचूर बाजारात उन्हाळी कांद्याची आवक कालच्या तुलनेत ४ हजार ४३५ क्विंटलने घटून ५ हजार ८०० क्विंटल झाली. सरासरी दर ५० रुपयांनी घसरून २ हजार ५० रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाला..Agrowon Podcast: ज्वारी बाजारात चढ-उतार, हळदीच्या भावात किंचीत वाढ, मेथी आवकेत चढ-उतार, कोबी दर जैसे थे तर आंबा दर टिकून.कोथिंबीर आवकेत चढ-उतारआज छत्रपती संभाजीनगर बाजारात आज कोथिंबिरीची आवक कालच्या तुलनेत ५ हजार नगांनी वाढून २२ हजार नग झाली. मात्र, सरासरी दर २०० रुपयांनी घसरून ४५० रुपये प्रति शेकडा होता. तर, पुणे-मोशी बाजारात स्थानिक कोथिंबिरीची आवक कालच्या तुलनेत १ हजार ९०० नगांनी घटून २० हजार ६०० नग झाली. सरासरी दर १ रुपयाने वाढून ९ रुपये प्रति नग होता. तसेच, पाटण बाजारात कोथिंबिरीची आवक कालच्या तुलनेत स्थिर राहून १३ हजार ५०० नग झाली. मात्र, सरासरी दर १ रुपयाने घसरून १२ रुपये प्रति नग पाहायला मिळाला..Agrowon Podcast: गहू बाजारात चढ-उतार, कापूस बाजारात तेजी, आले दरात स्थिरता, डाळिंबाच्या आवकेत घट, तर गवार दरात घट .भेंडी बाजार टिकूनराज्यातील पेन बाजारात आज भेंडीची आवक परवाच्या तुलनेत १८ क्विंटलने घटून ३१५ क्विंटल होती. मात्र, सरासरी दर स्थिर राहून ४ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल होता. तर, पुणे-मोशी बाजारात स्थानिक भेंडीची आवक कालच्या तुलनेत ५६ क्विंटलने वाढून १७४ क्विंटल झाली. सरासरी दर २५० रुपयांनी वाढून २ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल झाला. तसेच, नागपूर बाजारात स्थानिक भेंडीची आवक स्थिर राहून १०० क्विंटल झाली. सरासरी दरही स्थिर राहून ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल होता..मोसंबी दरात चढ-उतारराज्यातील नागपूर बाजारात आज स्थानिक मोसंबीची आवक कालच्या तुलनेत १८ क्विंटलने वाढून ३६२ क्विंटल झाली. मात्र, सरासरी दर १ हजार ५७५ रुपये प्रति क्विंटलवर स्थिर होता. तर, पुणे बाजारात स्थानिक मोसंबीची आवक २५ क्विंटलवरून १८० क्विंटलपर्यंत वाढली, सरासरी दर ५०० रुपयांनी घसरून ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल होता. तसेच, छत्रपती संभाजीनगर बाजारात मोसंबीची आवक ३७ क्विंटलवर स्थिर होती.तर बाजारातील सरासरी दर ६०० रुपयांनी वाढून ३ हजार १०० रुपये प्रति क्विंटल होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.