Agrowon Podcast: गव्हाचे दर टिकून; आले, तीळ, मिरची, तसेच काय आहे आजचे कापूस भाव?

Daily Commodity Rates: आज आपण आले, गहू, तीळ, हिरवी मिरची आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Products
Agriculture ProductsAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin:

तिळाला उठाव

तिळाला बाजारात उठाव मिळत आहे. आवक वाढल्यानंतर तिळाचे भाव कमी झाले होते. मात्र उठाव मिळत असल्याने दरपातळी आता काहीशी स्थिरावली आहे. आवकेचा दबावही कमी झाला. बाजारातील तिळाची आवकही काहीशी कमी जास्त होताना दिसत आहेत. तर बाजारात सध्या तिळाला प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे दर मिळत आहेत. बाजारातील तिळाची आवक पुढील काही आवड्यांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात सुधारणाही होऊ शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

हिरव्या मिरचीला उठाव

बाजारात हिरव्या मिरचीची आवक स्थिर आहे. तर दुसरीकडे हिरव्या मिरचीला उठाव चांगला आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचे दर टिकून आहेत. मध्यंतरी आवेकतील चढ उतारानुसार दरातही बदल पाहायला मिळत होते. पण सध्या हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. हिरव्या मिरचीची आवक पुढील काही आठवड्यांमध्ये स्थिर राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरातही काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

Agriculture Products
India Fertilizer Sales: देशात खत विक्रीत नऊ टक्के वाढ

गव्हाची आवक कायम

बाजारातील गव्हाची आवक वाढली आहे. तरीही गव्हाचे भाव मागील तीन आठवड्यांपासून टिकून आहेत. सरकारची गहू खरेदी सुरु झाल्यानंतर दरात काहीशी सुधारणा दिसून आली. सध्या बाजारात गव्हाची आवक चांगली आहे. मात्र दुसरीकडे गव्हाला उठावही चांगला आहे. त्यामुळे गव्हाचे भाव टिकून आहेत. देशातील महत्वाच्या उपादक राज्यांमध्ये गहू सध्या २ हजार ४०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. पुढील महीनाभर गव्हाची आवक चांगली राहील, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Agriculture Products
Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; हरभरा, मका, टोमॅटो तसेच काय आहेत कापूस भाव?

आल्याचे भाव दबावातच

राज्यातील सर्वच बाजारांमध्ये आल्याची आवक वाढली आहे. त्याचा परिणाम आल्याच्या दरावर दिसून येत आहे. सध्या आल्याला उठाव असला तरी वाढत्या आवकेमुळे आल्याचे भाव मागील दोन महिन्यात निम्म्यापेक्षा कमी झाले आहेत. सध्या बाजारात आल्याला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते ३ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यंदा आल्याच्या उत्पादनात वाढल्याचेही शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. आल्याची बाजारातील आवक काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरातही काहीसे चढ उतार दिसतील, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस स्थिरावला कापसाचे भाव दोन दिवस काहीसे नरमल्यानंतर पुन्हा एकदा स्थिरावले आहेत. सध्या बाजारात कापसाची आवक कमी झाली. मात्र सीसीआयची वाढलेली कापूस विक्री आणि वाढती आयात याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. सीसीआयने आतापर्यंत २५ लाख गाठींपेक्षा अधिक कापसाची विक्री केली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने आयात वाढत आहे. सध्या बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कापसाच्या भावात चढ उतार कायम राहतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com