
Market Bulletin:
कांदा भाव दबावातच
बाजारातील कांद्याची आवक जास्त असल्याने दरावर दबाव आला आहे. कांद्याचे बाजारभाव आता उत्पादन खर्चापेक्षा कमी झाले आहेत. नाफेडच्या कांदा खरेदीचेही भीजत घोंगडे आहे. त्याचा दबाव कांद्याच्या भावावर दिसून येत आहे. त्यामुळे कांदा भाव सध्या १ हजार १०० रुपये ते १ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. पुढील काही आठवडे कांद्याची बाजारातील आवक कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कांद्याच्या भावावरील दबाव कायम राहील. मात्र नाफेडची खरेदी सुरु झाल्यास बाजाराला काहीसा आधारही मिळू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
हरभरा दर टिकून
बाजारातील हरभरा आवक काहीशी कमी होताना दिसत आहे. आवक कमी झाली तशी हरभरा दरातही सुधारणा दिसून येत आहे. सध्या अनेक बाजारात भावपातळी हमीभावाच्या दरम्यान पोचली आहे. सध्या बाजारात हरभरा ५ हजार ४०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. त्यामुळे सरकारच्या हमीभाव खरेदीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळत आहे. आतपर्यंत सरकारची खरेदी खूपच कमी झाली. तर बाजारातील हरभरा आवक पुढच्या काळात आणखी कमी होण्याचा अंदाज आहे. याचा आधार दराला मिळेल, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
मका दर स्थिर
मक्याचा बाजार मागील दोन आठवड्यांपासून स्थिर दिसत आहे. बहुतांशी बाजारातील दरपातळी टिकून आहे. बाजारामध्ये सध्या रब्बीचा मका विक्रीसाठी येत आहे. यंत्यामुळे मक्याच्या दरावर काहीसा दबाव आला. सध्या मक्याला बाजारात सरासरी २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या भाव मिळत आहे. महत्वाच्या रब्बी मका उत्पादक भागातील आवक चांगली आहे. मक्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे टिकून राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे काही आठवडे मक्याच्या भावात काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
टोमॅटो आवक वाढली
बाजारातील वाढत्या आकेबरोबर टोमॅटोच्या दरावरही दबाव वाढत गेला. टोमॅटोच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये मोठी घसरण झाली. तोटा वाढल्याने बाजारातील आवक वाढत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. राज्यातील सर्वच बाजारांमध्ये टोमॅटोची आवक वाढलेली दिसत आहे. त्यामुळे टोमॅटोला सध्या बाजारात सरासरी ७०० ते ११०० रुपयांचा भाव मिळत आहे. टोमॅटो बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते. त्यामुळे दरावरही दबाव दिसू शकतो, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापूस दरात घसरण
कापसाच्या भावात मागील दोन दिवसांपासून काहीशी नरमाई दिसून आली. अनेक बाजारात कापसाची आवक कमी झाली. मात्र तरीही कापसाच्या भावावर दबाव वाढला. सध्या बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सीसीआयची कापूस विक्री वाढली. सीसीआयने आतापर्यंत २५ लाख गाठींपेक्षा अधिक कापसाची विक्री केली. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने आयात वाढत आहे. त्यामुळे कापसाच्या भावावर दबाव आहे. कापसाच्या भावात चढ उतार कायम राहतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.