Tur Rate : तुरीला यंदा काय दर मिळेल?

देशातील नवी तूर काही बाजारांमध्ये दाखल झाली आहे. मात्र यंदा देशातील तूर उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने तुरीचे दर टिकून राहण्याचा अंदाज होता. मात्र देशातील बाजारात सध्या तुरीचे दर नरमलेले दिसत आहेत.
Tur rate
Tur rate Agrowon
Published on
Updated on

सोयाबीन दरात किंचित सुधारणा

1. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयातेलाच्या दरात काहीशी सुधारणा झाली होती. तसेच देशातील काही बाजारांमध्येही सोयाबीन दरात क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. देशात आज सोयाबीनला सरासरी ५ हजार २५० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सचे ५ हजार ५०० ते ५ हजार ७५० रुपयांच्या दरम्यान होते. बाजारातील आवकही स्थिर होती. सोयाबीनचे दर सध्या दबावात असले तरी पुढील काळात सुधारणा होण्याची शक्यता आहे. सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

Tur rate
Soybean Rate : चीन कोरोना निर्बंध पूर्णपणे उठवण्याची शक्यता

कापूस दरातील चढ उतार कायम

2. आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात सध्या चढ-उतार सुरु आहेत. चीनकडून कापसाला मागणी वाढण्याचा अंदाज असल्याने जागतिक कापूस बाजाराला आधार मिळाला. देशात नोव्हेंबरच्या तुलनेत सध्या कापसाचे दर क्विंटलमागे ७०० रुपयांपर्यंत नरमले आहेत. सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ३०० ते ९ हजार रुपये दर मिळत आहे. मागील दोन दिवसांमध्ये कापूस दर काहीसे स्थिर आहेत. तर चालू महिन्यात कापूस दरात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज आहे. मात्र जानेवारीत कापूस दरात सुधारणा पाहायला मिळू शकते, असा अंदाज कापूस बाजार अभ्यासकांनी व्यक्त केला.

Tur rate
Cotton Rate : कापूस दर सुधारण्याचा अंदाज

हरभऱ्यामध्ये काहीशी तेजी

3. देशात सध्या हरभरा पेरणी सुरु आहे. सुरुवातीच्या टप्प्यात गेल्यावर्षीपेक्षा हरभरा लागवड अधिक दिसत असली तरी यंदा लागवड कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातच देशात लग्नसराई सुरु झाल्याने महत्वाच्या बाजारापेठांमध्ये हरभरा दरात क्विंटलमागे १०० रुपयांची वाढ दिसून आली. मात्र नाफेडच्या विक्रीचा दबाव बाजारावर कायम आहे. त्यामुळे हरभरा दरात फार मोठ्या तेजीची अपेक्षा नाही, असा अंदाज हरभरा बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

Tur rate
Chana Rate : मका स्थिर; हरभऱ्याच्या किमतींत वाढ

काकडीचे दर टिकून

4. राज्यातील बाजारात काकडीची आवक कमी आहे. मात्र सध्या थंडी कमी झाल्याने काकडीला चांगला उठाव मिळत आहे. परिणामी काकडीचे दरही चांगले आहेत. सध्या काकडीला प्रतिक्विंटल १३०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहील. तसेच उन्हाचा कडाका वाढल्यानंतर काकडीला मागणी वाढून दरही सुधारतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

तुरीला यंदा काय दर मिळेल?

5. यंदा देशातील तूर उत्पादन (Tur Production) घटण्याची शक्यता असल्याने तुरीचे दर (Tur Rate) टिकून राहतील, असा अंदाज होता. मात्र देशातील बाजारात सध्या तुरीचे दर नरमलेले दिसत आहेत. तरीही दर हमीभावापेक्षा (Tur MSP) जास्त आहेत. केंद्राने यंदा तुरीसाठी प्रति क्विंटल ६ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला. तर सध्या बाजारात (Tur Market) तुरीला ६ हजार ६०० ते ७ हजार ३०० रुपयांपर्यंत दर आहेत. नोव्हेंबरमध्ये तुरीला सरासरी ७ हजार ५०० ते ७ हजार ९०० रुपयांपर्यंत दर मिळत होता. मात्र आफ्रिका आणि म्यानमारमधून आयात (Tur Import) वाढली.

तसेच देशातील बाजारांत नवे पीक दाखल होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दर नरमल्याचं सांगितलं जातंय. तूर उत्पादनात कर्नाटक आणि महाराष्ट्र देशात आघाडीवर आहेत. या राज्यांत काही बाजारांमध्ये नव्या तुरीची आवक सुरु झाली. सध्या नव्या तुरीमध्ये ओलावा जास्त आहे. त्यामुळे या तुरीला ६ हजार ४०० रुपये ते ७ हजार २०० रुपये दर मिळत आहे. यंदा देशातील तूर उत्पादन घटणार आहे. त्यामुळे यंदा विक्रमी आयात झाली तरी त्याचा दरावर फारसा परिणाम होणार नाही, असं काही अभ्यासक सांगत आहेत. त्यातच सरकारही यंदा तुरीची खरेदी वाढवण्याचाही अंदाज आहे. त्यामुळे यंदा तुरीला सरासरी ७ ते ८ हजारांच्या दरम्यान दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com