Soybean Rate : चीन कोरोना निर्बंध पूर्णपणे उठवण्याची शक्यता

येत्या काही महिन्यांत चीन कोरोना निर्बंध पूर्णपणे उठवण्याची शक्यता आहे. त्यामुळे झिरो कोरोना पॉलिसी संपुष्टात येण्याची चिन्हे असून, चीनमधील अर्थकारणाला गती मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
China Covid
China Covid Agrowon

पुणे ः येत्या काही महिन्यांत चीन कोरोना निर्बंध (Covid Restriction China) पूर्णपणे उठवण्याची शक्यता आहे. त्यामुळे झिरो कोरोना पॉलिसी संपुष्टात येण्याची चिन्हे असून, चीनमधील अर्थकारणाला (China Economy) गती मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. चीनच्या निर्बंधांमुळे इतर देशांवरही मोठा परिणाम झाला असून, जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. चीनने निर्बंध उठवल्यावर पुरवठा साखळी सुरळीत होण्यासाठी मदत होईल. भारतातील शेतकऱ्यांसाठी या घडामोडी महत्त्वपूर्ण ठरणार असून, प्रामुख्याने कापूस आणि सोयाबीनची मागणी (Soybean Demand) वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पिकांचे दर सुधारण्याची चिन्हे आहेत.

China Covid
Soybean Rate : सोयाबीन सुधारण्यास अनुकुल स्थिती

चीन येत्या काही दिवसांत कोविड-१९ क्वारंटाइन प्रोटोकॉल शिथिल करण्याची शक्यता आहे. तसेच कोरोना चाचण्यांचे प्रमाणही कमी केले जाणार आहे. चीन सरकारने झिरो कोरोना पॉलिसीची अंमलबजावणी करण्यासाठी नव्याने कडक निर्बंध लागू केले होते. त्याची लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. सरकारच्या निर्णयाविरोधात अनेक शहरांत निदर्शने सुरू झाली. लोकांमधील रोष बघून सरकारने निर्बंध शिथिल करण्याचा यू टर्न घेतल्याचे मानले जात आहे.

China Covid
Cotton Market : बाजारात कापसाची आवक कमी

देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही. ती विक्रमी पातळीवर स्थिर आहे. परंतु गेल्या काही दिवसांत अनेक शहरांनी लॉकडाउन उठवला आहे. तसेच विषाणूची रोगकारक क्षमता कमी झाल्याचे उपपंतप्रधान सुन चुन्लन यांनी म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर निर्बंध शिथिल करण्याच्या निर्णयाप्रत सरकार आल्याचे बोलले जात आहे. कोरोना निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेला घरघर लागल्यामुळे चीनमधली जनता उद्विग्न झाली आहे.

अर्थव्यवस्था गेल्या काही दशकांतील नीचांकी स्थितीत पोहोचण्याची चिन्हे आहेत. चीनमध्ये महागाई प्रचंड वाढली असून, बेरोजगारीचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. ग्वांगझू येथे मंगळवारी (ता. २९) हिंसक निदर्शने झाल्यानंतर २४ तासांच्या आत सात जिल्ह्यांमध्ये तात्पुरते लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर एका जिल्ह्याने शाळा, रेस्टॉरंट्‍स, सिनेमागृहे आणि व्यापारी आस्थापने सुरू करण्याचे जाहीर केले. सरकार कोरोना निर्बंध मागे घेण्याच्या मनःस्थितीत असल्याचे उपपंतप्रधान चुन्लन यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले.

सुन यांचे वक्तव्य आणि ग्वांगझू येथे कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय पाहता येत्या काही महिन्यांत चीनमधील झिरो कोविड पॉलिसीचा शेवट होण्याचे ठोस संकेत मिळाले आहेत, असे विश्लेषकांनी सांगितले. लसीकरणात आणखी वाढ झाल्यानंतर चीन पुढील वर्षात कधीही आपली सीमा खुली करेल, अशी शक्यता जगभरात व्यक्त केली जाऊ लागली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com