Chana Rate : मका स्थिर; हरभऱ्याच्या किमतींत वाढ

कापूस, मका, हळद, हरभरा व सोयाबीन यांच्या किमती नोव्हेंबरमध्ये वाढत होत्या; मात्र सोयाबीनच्या किमती नंतर उतरू लागल्या आहेत. मक्याची मागणी वाढती आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात आवक वाढली तरी किमतीसुद्धा वाढत होत्या.
Chana  Rate
Chana RateAgrowon
Published on
Updated on

कापूस, मका, हळद, हरभरा व सोयाबीन (Soybean Rate) यांच्या किमती नोव्हेंबरमध्ये वाढत होत्या; मात्र सोयाबीनच्या किमती नंतर उतरू लागल्या आहेत. मक्याची मागणी (Maize Demand) वाढती आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात आवक वाढली तरी किमतीसुद्धा वाढत होत्या. कांद्याचे दर (Onion Rate) मात्र घसरले. पिंपळगावमध्ये या महिन्यात कांद्याच्या किमती रु. २६५० वरून रु. १४५० वर आल्या.

Chana  Rate
Cotton Boll Worm : तेलंगणामुळे बोंड अळीची भीती

या पूर्वी २०११, २०१६ व २०१८ च्या नोव्हेंबरमध्ये कांद्याच्या किमती रु. १००० पेक्षा कमी झाल्या होत्या. टोमॅटोचीही आवक वाढून किमती घसरल्या. या सप्ताहात कांद्याने रु. १,३३० ची पातळी गाठली आहे तर टोमॅटो रु. ४९२ वर आले आहेत.

१ डिसेंबर पासून NCDEX मध्ये मक्यासाठी एप्रिल डिलिव्हरी व हळदीसाठी जून डिलिव्हरी व्यवहार सुरू झाले आहेत.

या सप्ताहामध्ये किमतीतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

Chana  Rate
Chana Sowing : हरभऱ्याचा पेरा खरंच वाढला का?

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोट मधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) नोव्हेंबर महिन्यात वाढत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ०.४ टक्क्याने घसरून रु. ३२,९६० वर आले होते; या सप्ताहात ते ०.२ टक्क्याने घसरून रु. ३२,८९० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) १.७ टक्क्याने घसरून रु १,७५७ वर आले आहेत. कपाशीचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत.

Chana  Rate
Soybean Rate : सोयाबीन सुधारण्यास अनुकुल स्थिती

मका

मक्याच्या स्पॉट (छिंदवाडा) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती प्रति क्विंटल रु. २,२०० वर आल्या होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या रु. २,२०० वर स्थिर आहेत. फ्यूचर्स (जानेवारी डिलिव्हरी) किमती रु. २,२०० वर आल्या आहेत. मार्च फ्यूचर्स किमती रु. २,२४३ वर आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत. या वर्षी खरीप मक्याचे देशातील उत्पादन उच्चांकी राहील, असा शासनाचा अंदाज आहे. परंतु मक्याची मागणीसुद्धा वाढती राहण्याचे चित्र आहे.

Chana  Rate
Maize Rate : मक्याची आवक वाढली

हळद

हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात त्या १ टक्का घसरून रु. ७,४४१ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी घसरून रु. ७,३७७ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. ७,९२४ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती रु. ८,०३० वर आल्या आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती गेल्या सप्ताहात ५.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,९७३ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.७ टक्क्याने वाढून रु. ५,००६ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे.

मूग

मुगाच्या किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात रु. ७,१५० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे. सध्या किमती हमीभावापेक्षा कमी आहेत.

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) रु. ५,६२४ वर आली होती; या सप्ताहात ती २.५ टक्क्यांनी घसरून रु. ५,४८४ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात ०.७ टक्क्याने घसरून रु. ६,७९१ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.

कांदा

कांद्याच्या किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या. कांद्याची किमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,४२२ होती; या सप्ताहात ती रु. १,३३० वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ४०० वर आली होती. या सप्ताहात ती वाढून रु. ४९२ वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com