Onion Market Rate : कांदा उत्पादकांना कसा बसतोय तिहेरी फटका ?

बाजारात अद्यापही कांदा दर दबावात आहेत. सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होत आहे. त्यामुळे कांदा दर घसरल्याचे व्यापारी सांगतात. त्यामुळे सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तिहेरी फटका बसत आहे.
Onion
OnionAgrowon
Published on
Updated on

तुरीच्या दरात सुधारणा

1. तुरीच्या दरात मंगळवारी सुधारणा पाहायला मिळाली. मागील तीन आठवड्यांत तुरीच्या दरात नरमाई होती. सरकार तुरीवर स्टाॅक लिमिट लावू शकते, या भितीने तुरीचे दर नरमले होते. मात्र देशातील तूर बाजाराची स्थिती आणि मालाची कमी उपलब्धता यामुळे तुरीच्या दरात मंगळवारी क्विंटलमागे १०० ते ३०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली. राज्यातील लातूर बाजारात तुरीला प्रतिक्विंटल ६ हजार ८०० ते ७ हजार ८०० रुपये दर मिळाला. तर कर्नाटकातील गुलबर्गा बाजारात ७ हजार ६०० रुपये ते ८ हजार रुपयाने तुरीचे व्यवहार झाले. तुरीचा हा दर टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Onion
Tur Rate : तुरीचा दर काय राहू शकतो?

फ्लाॅवरचे दर सुधारण्याची शक्यता

2. बाजारात सध्या फ्लाॅवरच्या बाजारात संमिश्र स्थिती आहे. राज्यातील काही बाजारांमध्ये फ्लाॅवरला चांगला दर मिळतोय. तर काही ठिकाणी दर दबावात आहेत. जास्त आवक असलेल्या बाजार समित्यांमध्ये फ्लाॅवरचे दर १५०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. तर कमी आवकेच्या ठिकाणी दर २५०० ते ४५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. ऑगस्ट महिन्यातील सततच्या पावसामुळं पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं पुढील काळात फ्लाॅवरची आवक कमी होऊन दर सुधारू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Onion
Soybean Yellow Mosaic : सोयाबीनला विळखा ‘मोझॅक’चा

आवक कमी असूनही लिंबाचे दर कमीच

3. बाजारात लिंबाची आवक सध्या कमी होतेय. चालू हंगामात लिंबू पिकाला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सतत ८ ते १० दिवस पाऊस झाले. त्यामुळे लिंबाचा बहर गळून पडला. तर अनेक ठिकाणी कीड-रोगांचाही प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळं कमी उत्पादन हाती येत आहे. परिणामी बाजारातील पुरवठा कमी होतोय. राज्यातील पुणे आणि मुंबई बाजार समित्या वगळता दैनंदिन आवक ही ५० क्विंटलपेक्षाही कमी होतेय. सध्या लिंबाला सरासरी ३ हजार ५०० रुपये ते ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय. पुढील काळात लिंबाला आणखी मागणी वाढून दर सुधारू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Onion
Tomato, Onion Prices: पाकिस्तानमध्ये टोमॅटो ५००, कांदा ४०० रुपये किलो

मागणी वाढल्यानं झेंडूच्या दरात उसळी

4. झेंडूच्या फुलांना बाजारात सध्या चांगला दर मिळतोय. गौरी-गणपती तसंच दसरा आणि दिवाळीमध्ये झेंडूच्या फुलांना मागणी असते. या काळात झेंडूचा विशेष मानही असतो. त्यामुळं शेतकरीही या काळात उत्पादन हाती येईल असं नियोजन करून झेंडूची लागवड करतात. मात्र झेंडूच्या पिकाला पावसाचा फटका बसला. त्यामुळं सध्या बाजारातील आवक मर्यादीत आहे. त्यातच मागणी वाढल्यानं दरही चांगला मिळतोय. सध्या ५ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. झेंडूचा हा दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

कांदा उत्पादकांना कसा बसतोय तिहेरी फटका?

5. कांदा उत्पादकांना अद्यापही चांगला दर (Onion Rate) मिळत नाही. यंदा शेतकऱ्यांनी महागडे बियाणे (Onion Seed Rate), रोपे घेऊन कांदा लागवड (Onion Plantation) केली. पीक लागवडीनंतर (onion Cultivation) उन्हाचा मोठा फटका बसला. मार्च आणि एप्रिल महिन्यात गेल्या १२२ वर्षातील उच्चांकी तापमान होतं. त्यामुळं अनेक भागांत कांदा पीक (Onion Crop Damage) जळालं, वाढ खुंटली आणि रोगांचाही प्रादुर्भाव झाला. परिणामी उत्पादनात मोठी घट झाली. मात्र रब्बी आणि उन्हाळ कांदा एकाच वेळी बाजारात आला. त्यामुळं एप्रिल आणि मे महिन्यात कांद्याला प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपये किलोचा भाव होता. या दरातून लागवड खर्चही निघत नव्हता. त्यामुळं शेतकऱ्यांनी कांदा साठवणीला प्राधान्य दिलं. त्यासाठी काही शेतकऱ्यांनी कांदा चाळी भाड्यानेही घेतल्या. मात्र ऑगस्ट महिना संपला तरी अपेक्षित भाव मिळत नाही. तर कांदा चाळीत साठवूण आता बरेच महिने झाले.

आता चाळीतील कांदा दमट व पावसाळी वातावरणामुळं सडू लागलाय. आधीचं वाढलेला खर्च, घटलेलं उत्पादन आणि आता चाळीतील कांद्याचं नुकसान होतंय. त्यामुळं शेतकऱ्यांना चाळीतील कांदा बाहेर काढावा लागतोय. त्यामुळं बाजारातील दर दबावातच आहेत. सध्या कांद्याला बाजारात ७०० ते १४०० रुपये दर मिळतोय. बाजारातील कांदा आवक घटली किंवा मागणी वाढली तरच दर सुधारू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात काद्याला मागणी आहे. त्यामुळं सरकारनं कांदा निर्यातीसाठी प्रयत्न केल्यास दराला आधार मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com