Tomato, Onion Prices: पाकिस्तानमध्ये टोमॅटो ५००, कांदा ४०० रुपये किलो

पाकिस्तान भारतातून कांदा, टोमॅटो आयात करण्याची शक्यता
Tomato Onion
Tomato OnionAgrowon
Published on
Updated on

पुणेः पुराचा तडाखा बसलेल्या पाकिस्तानला सध्या भाजीपाला (Vegetables) आणि फळांचा (Fruits) मोठा तुटवडा (shortage) जाणवत आहे. त्यामुळे भारतातून कांदा (Onion) आणि टोमॅटोची (Tomato) आयात करण्याचा पर्याय पाकिस्तानमध्ये पुढे येत आहे. पाकिस्तानच्या मागणीवरून भारतातून कांदा आणि टोमॅटो निर्यात सुरु झाली तर देशातही दर सुधारतील, याचा फायदा शेतकऱ्यांनाही मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

पाकिस्तानला पुराचा (Flood) जोरदार तडाखा बसत आहे. बलूचिस्तान, सिंध आणि दक्षिण पंजाब या महत्वाच्या भाजीपाला उत्पादक भागांमध्ये पुराचे थैमान सुरु आहे. त्यामुळं भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बाजारात टोमॅटो आणि कांद्यासह इतरही भाजीपाल्याची आवक कमी झाल्याचे लाहोर येथील घाऊक व्यापारी जवाद रिझवी यांनी सांगितले. ते म्हणाले की, लाहोर येथील बाजारात सध्या टोमॅटो प्रतिकिलो ५०० पाकिस्तानी रुपयांवर पोचला. तर कांद्याने किलामागे ४०० रुपयांचा टप्पा गाठला. एरव्ही आवक सुरळीत असल्यास टोमॅटो आणि कांद्याचे दर १०० रुपयांपेक्षाही कमी असतात, असंही रिझवी यांनी सांगितले.

Tomato Onion
Chana Rate News : सणासुदीत हरभरा दर सुधारतील का ?

पाकिस्तानमधील हजारो एकरवरील भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. पुढील काळात टोमॅटोचे दर आणखी वाढून ७०० रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढू शकतात, असा अंदाजही रिझवी यांनी व्यक्त केला. तर बटाटा दर ४० रुपयांवरून १२० रुपयांपर्यंत वाढले आहेत. पाकिस्तानमधील भाजीपाला दरवाढ कमी करण्यासाठी सरकारला भारतातून आयात करावी लागेल. कारण वाघा सीमेवरून आयात सोपी पडते, असेही रिझवी सांगितले.

सध्या पाकिस्तानमधील लाहोरसह काही शहरांमध्ये अफगाणिस्तानातून टोमॅटो आणि कांदा आयात होत आहे. ही आयात तोरखाम सीमाभागातून सुरु आहे. लाहोर बाजार समितीचे सचिव शेहजाद चीमा यांनी सांगितले की, तोरखाम सीमेतून रोज १०० कंटेनर टोमॅटो आणि ३० कंटेनर कांदा आयात केला जात आहे. यापैकी २ कंटेनर टोमॅटो आणि एक कंटेनर कांदा रोज लाहोर शहराला पुरवला जात आहे. पण हा पुरवठा मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे. पाकिस्तानमध्ये सध्या ढोबळी मिरची आणि इतर काही भाज्यांचाही तुटवडा जाणवत आहे, असंही चीमा यांनी सांगितले.

Tomato Onion
Rice : भात पिकावरील कीड, रोगाचे नियंत्रण कसे कराल?

या संकटाच्या काळात पाकिस्तान सरकार भारतातून कांदा आणि टोमॅटो आयात करू शकते. कारण इराणधून भाजीपाला आयात करणे सोयीस्कर नाही. कारण अलिकडेच इराणच्या सरकारने आयात आणि निर्यात शुल्कात वाढ केल्याचे चीमा यांनी स्पष्ट केले.

फळांच्या दरानेही भरारी घेतली आहे. खारीक आणि केळी पिकाचे सिंध प्रांतात पुरामुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे या फळांचे भावही पुढील काळात वाढतील. पुरामुळे बलुचिस्तान आणि इतर भागांतून सफरचंदाचा पुरवठाही विस्कळीत झाला आहे, असेही पाकिस्तानमधील व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.

Tomato Onion
Climate Change:हवामान बदलामुळेच गहू उत्पादन घटले?

पाकिस्तानला सध्या कांदा आणि टोमॅटोची गरज आहे. तर भारतात कांद्याचे दर पडले आहेत. टोमॅटोलाही कमी दर मिळत आहे. पाकिस्तानच्या मागणीवरून भारतातून निर्यात सुरु झाल्यास कांदा आणि टोमॅटोला मागणी वाढेल. त्यामुळे दरात सुधारणा होऊ शकते, असे जाणकारांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com