Agrowon Podcast: देशातील बाजारात हरभऱ्याच्या भावातील सुधारणा कायम

Market Update : निवडणुकांनंतर हरभरा बाजारात सुधारणाही दिसू शकते, असा हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.
Chana
Chana Agrowon

Market Bulletin : देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात आज क्विंटलमागं ५० रुपयांपर्यंत सुधारणा झाली. सोयाबीनला सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांदरम्यान भाव मिळाला. तर बाजारातील आवक ३ लाख ४० हजार पोत्यांची झाली होती. एक पोते ५० किलोचे असते.

बाजारातील आवक पुढील काही दिवसांपासून कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाच्या वायद्यांमध्ये सुधारणा झाल्यानंतर आज बाजार समित्यांमधील कापूस भावातही सुधारणा दिसून आली. कापसाचा भाव क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांची वाढ झाली होती. कापसाचा भाव सरासरी ६ हजार ६०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान दिसून आला.

तर बाजारातील कापसाची आवक १ लाख ७३ हजार गाठींच्या दरम्यान कायम राहीली. कापसाची आवक आणखी काही दिवस कायम राहण्याचा अंदाज असून त्यानंतर आवक कमी होत जाईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Chana
Chana Sowing : हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्राने पार केला सरासरी क्षेत्राचा टप्पा

देशातील बाजारात कांद्याच्या भावात पुन्हा नरमाई दिसून आली. कांद्याचे भाव मागील काही दिवसांपासून १ हजार ते १ हजार २०० रुपयांच्या दरम्यान कायम आहेत. सध्या महाराष्ट्रातील कांदा आवक कमी होत आहे.

तर गुजरातमधील आवक टिकून आहे. यामुळे भाववाढीवर दबाव दिसतो, असेही त्यांनी सांगितले. मध्य प्रदेशातील कांदा आवकही सुरु झाली. कांद्याच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Chana
Chana Arrival : खानदेशात देशी हरभऱ्याची आवक वाढू लागली

देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव मागील दोन आठवड्यांमध्ये वाढले आहेत. यंदाच्या हंगामातील घटलेली लागवड आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता यामुळे हरभरा भाव वाढले आहेत. त्यातच सरकारकडील स्टाॅकही कमी होत आहे. त्यामुळे हरभऱ्याचा भाव सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान पोचला.

सरकार निवडणुका होईपर्यंत हरभरा दबावातच ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण हरभरा भाव जास्त कमी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. निवडणुकांनंतर हरभरा बाजारात सुधारणाही दिसू शकते, असा हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

तुरीच्या भावाताल तेजी कायम आहे. सध्या तूर आवकेचा हंगाम आहे. एरवी याच काळात आफ्रिकेतून तूर आयात होत असते. पण यंदा आफ्रिकेतून होणारी तूर आयात कमी आहे. त्यातच उत्पादन घटल्याने शेतकरीही मर्यादीत विक्री करत आहेत. यामुळे तुरीच्या भावाला चांगलाच आधार आहे.

सध्या तुरीला देशात ९हजार ५०० ते १०  हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सध्या बाजारातील तुरीची स्थिती पाहीली तर हा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com