Chana Sowing : हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्राने पार केला सरासरी क्षेत्राचा टप्पा

Chana Farming : यंदाच्या (२०२३-२४) रब्बी हंगामात परभणी व हिंगोली जिल्ह्यात हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्राने सरासरी क्षेत्राचा टप्पा पार केला आहे.
Chana Sowing
Chana SowingAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : यंदाच्या (२०२३-२४) रब्बी हंगामात परभणी व हिंगोली जिल्ह्यात हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्राने सरासरी क्षेत्राचा टप्पा पार केला आहे. शुक्रवार (ता. १२) पर्यंत परभणी जिल्ह्यात १ लाख ३७ हजार ४९४ हेक्टर ( १२२.५८ टक्के ) व हिंगोली जिल्ह्यात १ लाख ५६ हजार ७६३ हेक्टर (१३०.२४ टक्के) पेरणी झाली आहे.या दोन जिल्ह्यात मिळून हरभऱ्याचा एकूण २ लाख ९४ हजार २५७ हेक्टरवर पेरा झाला आहे. तर एकूण रब्बीचा ४ लाख ६६ हजार ५२५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

परभणी जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख ७० हजार ७९४ हेक्टर आहे. शुक्रवार (ता. १२) पर्यंत २ लाख ५६ हजार ३६१ हेक्टरवर (९४.६७ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख १२ हजार १७० असतांना १ लाख ३७ हजार ४९४ हेक्टर (१२२.५८ टक्के) पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीची १ लाख १३ हजार ८९ पैकी ९५ हजार ६६८ हेक्टरवर (८४.६० टक्के), गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी २० हजार ५१६ हेक्टर (५२.१९ टक्के), मक्याची २ हजार ८६ पैकी ८४४ हेक्टर (४०.४९ टक्के) पेरणी झाली आहे.

Chana Sowing
Chana Sowing : हरभरा पेरणीच्या क्षेत्रात घट

करडईची ३ हजार ३७१ पैकी १ हजार ७१२ हेक्टर (५०.८० टक्के),जवसाची ११९ पैकी १२ हेक्टर (१०.०९ टक्के), तिळाची ३३.६४ पैकी २७ हेक्टर (८०.२६ टक्के), सूर्यफुलाची २६.२ पैकी २ हेक्टर (७.६८ टक्के) पेरणी झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात शुक्रवार (ता.१२) पर्यंत रब्बीच्या सरासरी १ लाख ७६ हजार ८९१ हेक्टर पैकी २ लाख १० हजार १६४ हेक्टर (११८.८१६ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात हरभऱ्याची १ लाख २० हजार १४७ पैकी १ लाख ५६ हजार ७६३ हेक्टर (१३०.२४ टक्के) पेरणी झाली. ज्वारीची ११ हजार ६९७ पैकी १६ हजार ८९९ हेक्टर (१४४.४७ टक्के), गव्हाची ४२ हजार ५०५ पैकी ३३ हजार ८२३ हेक्टर (७९.५७ टक्के), मक्याची ९७१ पैकी ६०९ हेक्टर (६२.७२ टक्के) पेरणी झाली.

Chana Sowing
Chana Rate : किरकोळ बाजारात हिरव्या हरभऱ्याचे दर २० रुपये किलो

करडईचे सरासरी क्षेत्र २०५ असतांना १ हजार ५७८ हेक्टर (७२८.३९ टक्के), तिळाची १८.६६ पैकी ४९ हेक्टर पेरणी झाली आहे. हरभऱ्याची सरासरीपेक्षा जास्त पेरणी झालेल्या तालुक्यात परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा, हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढानागनाथ, सेनगाव या तालुक्यांचा समावेश आहे. गंगाखेड तालुक्यात हरभऱ्याचा सरासरीपेक्षा कमी पेरा आहे.

परभणी-हिंगोली जिल्हा हरभरा पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये) (शुक्रवार ता. १२ पर्यंत)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी २५००० २६६९३ १०६.७७

जिंतूर ३२८९० ४१५३४ १२५.९४

सेलू १०६३५ १२४३३ ११६.९०

मानवत ५७९३ ९२१४ १५९.०५

पाथरी ४२५६ ७६९३ १८०.७२

सोनपेठ ६९०३ ७९१३ ११४.६२

गंगाखेड १११८६ १०००० ८९.४०

पालम ५७६१ ८६६४ १५०.३८

पूर्णा ९६५४ १३३५० १३७.४०

हिंगोली २२०१७ २७८३० १२६.१९

कळमनुरी ३८२४९ ४४२३३ ११५.३०

वसमत १९५२४ २७५४५ १४०.०८

औंढा नागनाथ १६९७८ २८२०० १६६.१०

सेनगाव २३३७९ २८९५५ १२३.८५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com