Agrowon Podcast : देशभरात तुरीचा सरासरी भाव कायम

Market Update : तुरीच्या भावातील तेजी यापुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Tur
Tur Agrowon
Published on
Updated on

Market Bulletin : केंद्र सरकारने ५४ हजार टन कांदा निर्यातीला दिलेल्या परवनगीनंतर कांदा भावात काहीशी वाढ झाली होती. कांदा भावात झालेली ही वाढ आजही कायम होती. देशातील बहुतांशी बाजारांमध्ये कांद्याचे भाव टिकून होते.

कांद्याला आजही सरासरी १ हजार ४०० ते १ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर बाजारातील कांदा आवक कायम होती. पुढील काळात बाजारातील आवक कमी होत जाऊन कांद्याच्या भावाला आधार मिळू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव दबावातच आहेत. सोयाबीन बाजारातली निराशेचे वातावरण कायम असून भाव गेल्या तीन वर्षातील निचांकी पातळीवर आहेत. तर देशातील बाजारातही सोयाबीन जागचे हालण्याचे नाव घईना.

आजही सोयाबीनचे भाव ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजारातील आवक दीड लाख क्विंटलच्या दरम्यान कायम होती. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Tur
Tur Market: तुरीच्या भावात काही ठिकाणी थोडीशी नरमाई

कापसाचे वाढलेले भाव कायम आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे सरासरी भाव टिकून आहेत. भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत पण भावात मोठी नरमाई आली नाही. देशातील बाजारात कापसाची आवक आजही घटली होती. त्यामुळे भावात अनेक बाजारांमध्ये क्विंटलमागं ५० रुपयांपर्यंत वाढ झाली होती.

आज कापसाचा सरासरी भाव ७ हजार ते ७ हजार ३५० रुपयांच्या दरम्यान होता. कापसाची आवक यापुढच्या काळातही घटत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भावाला चांगला आधार मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Tur
Tur Rate : विदर्भात तूर पोचली दहा हजार रुपयांवर

तुरीच्या भावातील तेजी कायम आहे. केंद्र सरकार स्वस्त तूर आयातीचा प्रयत्न करत आहे. पण भारताची वाढलेली मागणी आणि गरज लक्षात घेऊन निर्यातदार देश स्वस्तात माल द्यायला तयार नाहीत. त्यामुळे देशात तुरीचे भाव सरासरी ९ हजार ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

देशातील बाजारात आवक कमी आहेच. शिवाय आयातही घटलेली दिसते. त्यामुळे तुरीच्या भावातील तेजी यापुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

गवारचे भाव मागील काही आठवड्यांपासून कायम आहेत. बाजारातील गवारची आवक कमी झाली. उठाव मात्र चांगला आहे. त्यामुळे गवारच्या भावातील तेजी कायम आहे. आजही गवारला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपये दर मिळाला.

गवारची लागवड कमी असल्याने मालही कमी उपलब्ध होत आहे. सध्या गवारच्या लागवडीही कमी दिसतात. त्यामुळे पुढील काळातही गवारची आवक कमी राहून भाव तेजीत राहण्याचा अंदाज आहे, असे भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com