Agrowon Podcast : गव्हाच्या भावात काहीशी सुधारणा

Market bulletin : दिवाळीच्य काळात मार्केट काही दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे नड असलेले शेतकरी आताच माल विकत आहेत.
Agrowon Podcast : गव्हाच्या भावात काहीशी सुधारणा

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात काहिशी नरमाई आली होती. सोयाबीनचे वायदे १३.६९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४४९ डाॅलर प्रतिटनाचा टप्पा गाठला होता. देशातील बाजारात मात्र सोयाबीनचे व्यवहार त्याच भावपातळीवर होते. सोयाबीनला आजही प्रतिक्विंटल ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांचा भाव मिळाला. तर बाजारातील सोयाबीनची आवक चांगली होती. दिवाळीमुळे शेतकरी सोयाबीन विकत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. त्यामुळे बाजारातील आवक चांगली असून मिल्सना गरजेपुरता माल मिळत आहे, असे अभ्यासकांनी सांगितले.

Agrowon Podcast : गव्हाच्या भावात काहीशी सुधारणा
Agrowon Podcast : कांद्याला काय भाव मिळतोय?

कापसाच्या वायद्यांमध्ये आज काहिशी नरमाई आली. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ७५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. कापसाच्या वायद्यांमध्ये मागील तीन दिवसांपासून चढ उतार सुरु आहेत. देशातील वायदेही काही प्रमाणात नरमले होते. कापूस वायद्यांवर सध्या आंतरराष्ट्रीय बाजाराचा दबाव दिसून येत आहे. तर बाजार समित्यांमधील आवक स्थिर दिसते. बाजार समित्यांमध्ये कापसाला सध्या ६ हजार ६०० ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. कापसाचे भावाच्या भावात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.  

तुरीचे भाव मागील दोन दिवसांपासून स्थिरावले होते. सणामुळे सध्या तुरीला चांगली मागणी आहे. पण सरकारच्या दबावामुळे दर काहीसे स्थिरावले आहेत. तूर डाळिला उठाव असला तरी सणाच्या काळात भाव वाढू नये, यासाठी सरकार सर्व ते प्रयत्न करत आहे. याचा परिणाम दरवाढीवर झाला. मागील आठवड्यात चांगली सुधारणा झाल्यानंतर भाव स्थिरावले आहेत. सध्या देशातील बाजारात तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १२ हजारांचा भाव मिळत आहे. बाजारात सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी आहे. त्यामुळे तुरीच्या भावात चांगलीच वाढ झाली. सरकार तुरीची आयात वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण भारतात भाव वाढल्याने निर्यातदार देशही तुरीची निर्यात मर्यादीत स्वरुपात करत आहेत. निर्यातदार देशांनाही चांगल्या भावाची अपेक्षा आहेच. त्यामुळे तुरीचे भाव देशातील बाजारात तेजीतच राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Agrowon Podcast : गव्हाच्या भावात काहीशी सुधारणा
Agrowon Podcast : देशातील बाजारात सोयाबीनमध्ये सुधारणा

टोमॅटोच्या भावात सध्या चढ उतार सुरु आहेत. टोमॅटोची आवक काही बाजारात स्थिर असून काही ठिकाणी घटलेली आहे. पण भावपातळीतही मोठी तफावत दिसून येत आहे. टोमॅटोला मागील काही दिवसांपासून उठाव आहे. पण दरात अपेक्षित वाढ नाही. टोमॅटोला काही बाजारात सरासरी ७०० ते ९०० रुपये भाव मिळत आहे. तर काही बाजारात १ हजार ते १ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. टोमॅटोला अद्यापही अपेक्षित भाव नसल्याने शेतकरी नाराज आहेत. सध्या टोमॅटो पिकाला कमी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. त्यामुळे पुढील काळात आवक कमी होत जाणार आहे. त्यामुळे टोमॅटोचे भावही सुधारू शकतात, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सणांमुळे गव्हाला चांगलाच उठाव मिळत आहे. त्यामुळे मागील आठवडाभरात गव्हाच्या भावात क्विंटलमागं किमान १०० रुपयांची वाढ झाली आहे. देशातील गहू उत्पादन सलग दुसऱ्या वर्षी कमी झालं होतं. तसेच सरकारला चालू वर्षीही खरेदीचं उद्दीष्ट साध्य करता आलं नाही. पण बाजारातील वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी सरकार बफर स्टाॅकमधील गहू बाजारात विकत आहे. पण एफसीआयच्या विक्रीतही गव्हाला चांगला भाव मिळतोय. त्यामुळे खुल्या बाजारात गव्हाचे भाव आता २ हजार ८०० ते ३ रुपयांच्या दरम्यान पोचला. गव्हाचे उत्पादन यंदाही कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गव्हाचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com