Tur Market Rate : सरकार स्टाॅकमधील तूर विकणार; भाव कमी होतील का?

Tur Bajarbhav : तुरीचे भाव कमी करण्यासाठी सरकारने स्टाॅक लिमिट लावले. पण तरीही तुरीच्या भावात सरकारच्या अपेक्षेप्रमाणे घट झाली नाही. दरातही काहीशी नरमाई आली पण सरकारला भाव आणखी कमी करायचे आहेत.
Tur Market
Tur MarketAgrowon
Published on
Updated on

Tur Production : देशातील तुरीचे उत्पादन घटल्यानंतर बाजारात मोठी तेजी आली. तुरीचे भाव कमी करण्यासाठी सरकारने मुक्त आयात धोरण राबवले, स्टाॅक लिमिटही लावले. पण तुरीच्या दरातील तेजी कमी झाली नाही.

त्यामुळे सरकारने आता बफर स्टाॅकमधील तूर मिलर्सना विकून बाजारातील तूर डाळीची उपलब्धता वाढवून दर कमी करण्याचा निर्णय घेतला. पण मुळात सरकारडे तुरीचा स्टाॅकच कमी आहे. त्यामुळे या निर्णयाचा बाजारावर फारसा परिणाम दिसणार नाही, असे अभ्यासकांनी सांगितले.

तुरीचे भाव कमी करण्यासाठी सरकारने स्टाॅक लिमिट लावले. पण तरीही तुरीच्या भावात सरकारच्या अपेक्षेप्रमाणे घट झाली नाही. दरातही काहीशी नरमाई आली पण सरकारला भाव आणखी कमी करायचे आहेत. स्टाॅक लिमिटनंतर देशातील बाजारात तुरीचे भाव २०० ते ४०० रुपयांनी कमी झाले.

सध्या अनेक बाजारांमध्ये तरीचे भाव ९ हजार ते १० हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर तूर डाळीचे भाव १३० ते १४० रुपयांवर आहेत. काही बाजारांमध्ये तूर डाळ १५० रुपयांपेक्षा अधिक भावात विकली जात आहे.

Tur Market
Tur Market Rate : तुरीच्या भावात २०० रुपयांपर्यंत चढ उतार

मागील महिनाभरात तूर डाळीच्या भावात किलोमागे ८ रुपयांची वाढ झाली. तूर डाळीचे भाव कमी होत नसल्याने सरकारने आता बफर स्टाॅकमधील तूर विकण्याचा निर्णय घेतला. देशात तुरीची आयात सुरु होत नाही तोपर्यंत सरकार स्टाॅकमधील तूर विकणार आहे.

नाफेड आणि एनसीसीएफ या दोन संस्थांकडी स्टाॅक हळूहळू बाहेर काढला जाणार आहे. सरकार ऑनलाईन लिलावाच्या माध्यामातून मिलर्सना तुरीची विक्री करणार आहे. यातून ग्राहकांसाठी तुरीचा पुरवठा वाढविण्याचा सरकार प्रयत्न करणार आहे.

स्टाॅकमधील किती तूर आणि केव्हा बाहेर काढयची हे बाजारातील स्थिती पाहून ठरवले जाईल. बाजारातील तुरीची उपलब्धता आणि डाळीचे दर यावरून सरकार विक्रीचा निर्णय घेईल. पण तुरीची आयात सुरु होईपर्यंत सरकार विक्री करणार आहे.

सध्या केवळ म्यानमारमधून तूर आयात सुरु आहे. त्याचेही प्रमाण कमी आहे. भारतातील बाजारात तुरीचे दर वाढल्याने म्यानमारमधील निर्यातदारांनी दर वाढवले. यामुळे आफ्रिकेतील तुरीची वाट पाहावी लागणार आहे. आफ्रिकेतील तूर ऑगस्टपासून बाजारात येईल. ही तूर देशात आल्यानंतर दरावर दबाव येऊ शकतो, असे अभ्यासक सांगत आहेत.

सरकारकडे पुरेसा स्टाॅक नाही

सरकारने स्टाॅकमधील तूर मिलर्सना विकण्याची घोषणा केली. किती तूर मिलर्सना विकणार आणि सरकारकडे तुरीचा किती स्टाॅक आहे? याची माहिती दिली नाही. मुळात सरकारकडे तुरीचा पुरेसा स्टाॅकच नाही. मागील हंगामात सरकारने तोकडी खेरदी केली होती.

यंदा तर बाजारात तेजीत होता. त्यामुळे सरकारला तूर मिळाली नाही. सरकारने आयात तूर खेरदीचा निर्णय घेतला. पण त्यातही सरकारला यश आले नाही. त्यामुळे सरकारकडे तुरीचा जास्त स्टाॅक नाही, असे जाणकारांनी सांगितले.

Tur Market
Tur, Maize Market : तूर, मक्याच्या बाजारभावात वाढ

बाजारावर परिणाम होईल का?

सरकारकडे सध्या सव्वा लाख टनांच्या दरम्यान तुरीचा स्टाॅक असण्याची शक्यता आहे. त्यापैकी नाफेडकडे ६५ हजार टन आणि एनसीसीएफकडे ६० हजार टन तूर आहे, असे व्यापारी आणि मिलर्सकडून सांगण्यात आले. तर काही जणांच्या मते दोन लाख टन तूर आहे. दुसरीकडे देशात महिन्याला साडेतीन लाख टनांची गरज असते.

म्हणजेच सरकारकडे असलेल्या तुरीतून देशाची १५ दिवसांची गरज पूर्ण होईल. त्यामुळे दीर्घाकाळात बाजारावर दबाव दिसणार नाही. पण बाजारावर याचा मानसिक परिणाम होऊ शकतो. मात्र दीर्घकाळात तुरीचा बाजार तेजीतच राहू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com