
Market Bulletin:
बेदाणा दर टिकून
लग्नसराई आणि सण समारंभामुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे. अजूनही बाजारातील बेदाणा आक मर्यादीत आहे. यंदा बेदाणा निर्मितीला द्राक्षटंचाई भासली. त्यामुळे बेदाणा निर्मिती संथगतीने सुरू आहे. त्यामुळे बेदाण्याच्या दरात झालेली वाढ टिकून आहे. नव्या बेदाण्याला प्रति किलोस १०० ते २५० रुपये दर मिळत आहे. त्यातच रमजान ईद, होळी सणानिमित्त देशभरातून बेदाण्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे दरही टिकून राहतील, असा अंदाज बेदणा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
गव्हाचा बाजार स्थिरावला
देशातील बाजारात गव्हाच्या भावातील चढ उतार मागील काही दिवसांपासून काहीसे स्थिरावले आहेत. सरकार खुल्या बाजारात गव्हाची विक्री करत असल्याने दरावर परिणाम दिसत आहे. गव्हाचा भाव देशभरात सरासरी २ हजार ६०० हजार ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होता पोचला. हा दर मागील दोन आठवड्यांपासून स्थिर आहे. गव्हाच्या भावातील नरमाई सध्या थांबली आहे. मात्र बाजारातील गव्हाची आवक वाढल्यानंतर दरावर आणखी दबाव येऊ शकतो. तसेच गव्हाचे भाव हमीभावाच्या दरम्यान येतील, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी दिला.
तुरीचा भाव दबावात
देशातील बाजारात तुरीची आवक वाढत आहे. आवक वाढल्यानंतर भावावर देखील दबाव वाढला आहे. तुरीचे भाव सध्या हमीभावापेक्षा कमी आहेत. तुरीला यंदा ७ हजार ५५० रुपये हमीभाव सरकारने जाहीर केला. तर बाजारात सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. दुसरीकडे सरकारची हमीभावाने खेरदीही सुरु आहे. त्यामुळे बाजाराला एक आधार आहे. पुढील दीड-दोन महिने बाजारातील तुरीची आवक चांगली राहणार आहे. त्यामुळे दरपातळी या काळात हमीभावाच्या आसपास राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
सोयाबीनमध्ये नरमाई
प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव आज काहीसे स्थिर ठेवले होते. त्यामुळे बाजार समित्यांमधील भावही स्थिर दिसले. आज प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खेरदीचे भाव ४ हजार २५० ते ४ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ३ हजार ७०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील सोयाबीनची आवकही स्थिर आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापसात काहीशी सुधारणा
कापसाचे बाजारभाव आज स्थिर होते. बाजारातील कापसाची आवकही मागील आठवडाभराप्रमाणे सरासरी एक लाख गाठींच्या दरम्यान आहे. बाजारातील कमी होत असलेली आवक आणि उद्योगांची असलेली मागणी याचा आधार कापूस बाजाराला आहे. त्यामुळे कापसाची दरपातळी स्थिर दिसत आहे. आजही कापसाला सरासरी ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. देशात बाजारातील आवक कमी होत असल्याने दराला काहीसा आधार मिळत आहे. कापसाची आवक मार्च महिन्यातही कमी होईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.