Soybean Deposit Delay: सोयाबीन डिपॉझिटच्या विलंबाने चुकारे रखडले

Soybean Payment Issue: राज्यात यंदा मोठ्या प्रमाणावर सोयाबीन खरेदी झाली असली तरी अद्याप आठ लाख क्विंटलपेक्षा जास्त माल गोदामात साठवायचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे चुकारे रखडले आहेत. गोदामांमध्ये जागेअभावी सोयाबीन डिपॉझिटला विलंब होत असल्याने अनेक ठिकाणी हमीभावाचे पैसे मिळालेल नाहीत.
Soybean
SoybeanAgrown
Published on
Updated on

Akola News: राज्यात यंदा बंपर सोयाबीन खरेदी झाली असून, ६ फेब्रुवारीला या खरेदीला पूर्णविराम देण्यात आला. मात्र आता पंधरा दिवस लोटले तरी अनेक ठिकाणी खरेदी केलेले सोयाबीन गोदामात डिपॉझिट झालेले नसल्याने शेतकऱ्यांचे चुकारे रखडले आहेत. राज्यात अद्याप आठ लाख क्विंटल माल डिपॉझिट व्हायचा आहे.

या वर्षी बाजारात सोयाबीनचे दर कमालीचे गडगडलेले असल्याने शेतकऱ्यांचा ओढा हमीभाव खरेदी केंद्राकडे वळाल्याने एक कोटी १२ लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीन खरेदी झाली आहे. शासनाने हंगामात दोन वेळा मुदतवाढ देऊन खरेदी केली. अखेरीस सहा फेब्रुवारीला ही प्रक्रिया बंद केली गेली. त्यानंतर मात्र खरेदी केलेला माल गोदामांमध्ये साठवण्याची लगबग सुरू आहे. मात्र साठवणुकीच्या मर्यादा उघड झाल्या.

Soybean
Soybean Rate : वाशिमच्या शेतकऱ्यांची मागणी: सोयाबीनला ८ हजारांचा हमीभाव हवा

अनेक ठिकाणी वाहनांतील माल आठ-आठ दिवस गोदामात साठवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते आहे. या ठिकाणी अनेक अडचणी येत आहेत. अकोल्यासह इतर महत्त्वाच्या ठिकाणी वाहनातील सोयाबीन गोदामात साठवण्यासाठी विलंब होत आहे. परिणामी या मालवाहुतकीसाठी वाहने उपलब्ध करून देण्यास वाहन मालकही आता मागेपुढे करू लागले असल्याचे एका जबाबदार अधिकाऱ्याने सांगितले.

या हंगामात खरेदी केलेला संपूर्ण सोयाबीन गोदामात डिपॉझिट व्हायला आणखी काही दिवस लागणार आहे. अनेक केंद्रावर खरेदी झालेले सोयाबीन अद्यापही पडून आहे. हा संपूर्ण माल डिपॉझिट होऊन त्याच्या रीतसर पावत्या जोपर्यंत ऑनलाइन जाणार नाहीत, तोवर चुकाऱ्यांचा विलंब काळ वाढत जाईल, असेही सांगितले जात आहे. मागील काही दिवसांत डिपॉझिट केलेल्या सोयाबीनच्या पावत्या ऑनलाइन करायला वेबसाइट बंदचा फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Soybean
Soybean Price: सोयाबीनचे दर एक हजाराने पडले; शेतकरी अडचणीत!

सोयाबीन खरेदीची प्रक्रिया आटोपली नसल्याने तूर खरेदीचे घोंगडे अडकले आहे. बाजारात तुरीला सहा हजारांपासून दर मिळतो आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीन प्रमाणेच हमीभाव खरेदीकडे वळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आता तूर खरेदीसाठी यापूर्वी प्रमाणेच सर्व खरेदीदार एजन्सीजला परवानगी देण्यात आल्याचे वृत्त आहे. सोयाबीन खरेदीसाठी केवळ दोनच एजन्सी सुरुवातीला नेमण्यात आल्या होत्या. परंतु हे धोरण आता बदलण्यात आल्याचे समजते.

संग्रामपूर येथील खरेदी-विक्री संस्थेच्या केंद्रावर २३ जानेवारीला रोजी सोयाबीन मोजणी करून दिले. त्याचे अद्याप चुकारे मिळालेले नाहीत. याच पिकावर वर्षभराचा घरखर्च व शेतीची मशागत अवलंबून आहे. अजून पैसे आलेले नाहीत. पुढील व्यवहार कसे करायचे याची चिंता भेडसावत आहे.
सुनील बाबाराव ठाकरे, बोडखा, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com