
Market Bulletin :
काबुली हरभरा टिकून
देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन कमी झाले. काबुली हरभऱ्याचा पेरा महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये वाढला होता. मात्र बदलत्या वातावरणाचा पिकाला फटका बसला. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पिकाला पोषक थंडीच जाणवली नाही. त्यातच तापमान सरासरीपेक्षा अधिक राहीले. त्यामुळे उत्पादन कमी राहीले. परणामी दरही टिकून आहेत. एप्रिल महिन्यापासून काबुली हरभरा ११ हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. यापुढील काळात बाजारातील काबुली हरभऱ्याची आवक कमी होत जाईल. मात्र काबुली हरभऱ्याला उठाव चांगला राहील. त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दरही टिकून राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
हापूस आंबा तेजीतच
हापूस आंब्याचा हंगाम जवळपास आटोपला आहे. हापूस आंबा यंदाच्या हंगामात तेजीतच राहीला. सुरुवातीपासूनच हापूस आंब्याला चांगला दर मिळाला. कारण यंदा हापूसचे उत्पादन जवळपास ४० टक्क्यांनी कमी झाले होते. बदलत्या वातावरणामुळे मोहर गळाला. त्यामुळे फळधारणाच कमी झाली. त्यातच फळगळही झाल्यामुळे उत्पादन कमी राहीले. त्यामुळे गुढीपाडव्याला गुणवत्तेप्रमाणे डझनला १ हजार ते १८०० रुपये दर मिळाला. नंतर हा दर १ हजारांपर्यंत टिकून राहीला. सध्या हापूसला ६०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. यंदा हापूस आंबा हंगामाचा शेवट गोड झाल्याने उत्पादकांमध्ये समाधान आहे.
बेदाण्याचा भाव तेजीतच
यंदा बेदाण्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे बेदाण्याला चांगला दर आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात बेदण्याला प्रति किलोस गुणवत्तेप्रमाणे ७० ते २२५ रुपयांपर्यंत असा दर होता. एप्रिलपासून बेदाण्याला मागणीही वाढली. त्यामुळे बेदाण्याच्या दरात वाढ झाली. सध्या बेदाणा प्रतिकिलो १२० ते २८० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. सुरुवातीपासून दर चांगले मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी निम्म्या बेदाण्याची विक्री केली. सध्या बेदाण्याचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. पुढच्या काळात बाजारातील आवकही कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बेदाण्याचे दर टिकून राहू शकतात, अशा अंदाज बेदाणा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कांदा दर दबावातच
कांद्याचे बाजारभाव दबावातच आहेत. कांद्याची बाजारातील आवक चांगली आहे. त्यातच वाढलेली उष्णता आणि अचानक पावसामुळे कांदा खराब होत आहे. कांद्याची नासाडी वाढली आहे. चाळीत साठवलेल्या कांद्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर नाईलास्तव कांदा विकण्याची वेळ आली. तर बाजारातही कांद्याला दर कमीच आहेत. सध्या बाजारात कांदा ९०० ते ११०० रुपयांच्या दरम्यान कांदा विकला जात आहे. बदलत्या वातावरणामुळे कांद्यावर परिणाम होत असून टिकवण क्षमतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे हा कांदा शेतकऱ्यांना विकावाच लागणार आहे. याचा परिणाम दरावरही दिसू शकतो. कांदा दर आणखी काही दिवस दबावातच राहू शकतात, अशा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापूस दर स्थिर
देशातील बाजारात कापसाचा भाव टिकून आहे. तर कापसाची बाजारातील आवक कमीच आहे. कापसाची आवक २५ हजार गाठींच्या दरम्यान पोचली. मात्र दुसरीकडे सीसीआयची कापूस विक्री वेगाने सुरु आहे. त्यामुळे बाजारातील कापूस आवक कमी असली तरी कापसाच्या बाजारावर दबाव आहे. दरपातळी स्थिर आहे. कापसाला सध्या सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार १०० ते ७ हजार ७०० रुपयांचा दर मिळत आहे. कापूस बाजारातील आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे. मात्र सीसीआयकडे कापसाचा चांगला स्टाॅक आहे. त्यामुळे कापसाचे दर स्थिर राहतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.