Maize Arrival: मलकापुरात मक्याची तीन हजार क्विंटल आवक

Malkapur Maize Market: मलकापुर बाजार समितीत दररोज तीन हजार क्विंटलपेक्षा अधिक मक्याची आवक होत असून, येथील चांगल्या दर्जाच्या मक्याला २०८५ रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. मलकापुर आता केवळ औद्योगिकच नव्हे तर कृषी व्यापारातही महत्त्वपूर्ण केंद्र बनले आहे.
Maize
MaizeAgrowon
Published on
Updated on

Buldana News: बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर हे शहर आता केवळ औद्योगिक दृष्टिकोनातून नव्हे, तर कृषी मालाच्या दृष्टीनेही आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहे. विशेषतः मका या पिकाच्या व्यापारात मलकापूरने आपले महत्त्व अधोरेखित केले असून, सध्या येथे दररोज तीन हजार क्विंटलपेक्षा अधिक मक्याची आवक नोंदवली जात आहे.

विदर्भ-खानदेशच्या सीमेवर असलेल्या मलकापूर बाजार समितीमधील आकडेवारीनुसार, विविध भागातील शेतकरी आपला मका येथे विक्रीसाठी आणतात. यामध्ये विशेषतः बुलडाणा जिल्ह्यासह लगतच्या भागातून व शेजारच्या राज्यातील शेतकऱ्यांचाही सहभाग असतो. बाजारात मका थेट ट्रक, ट्रॅक्टरद्वारे आणला जातो.

Maize
Maize Production : खानदेशात मका पिकात उत्पादन कमी

येथून मका देशभरातील पशुखाद्य उद्योग, स्टार्च फॅक्टरी आणि अल्कोहोल उत्पादक कंपन्यांमध्ये पाठवला जातो. पंजाब, हरियाना, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पश्‍चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये मलकापूरहून मोठ्या प्रमाणावर मका रवाना होतो. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, येथे चांगल्या दर्जाचा मका व मोठ्या प्रमाणात उपलब्धता होत असल्याने खरेदीदारांचा कल असतो.

Maize
Maize Price: मका हमीभावापेक्षा कमी दरात! शेतकऱ्यांना मोठा फटका

जिल्ह्यात खरीप, रब्बी तसेच उन्हाळी हंगामातही शेतकऱ्यांचा मक्यावरील कल वाढताना दिसतो आहे. खरीप, रब्बीत हे प्रमुख पीक म्हणून पुढे येत आहे. यामागे साहजिकच हे पीक तुलनेने कमी खर्चिक आणि टिकाऊ मानले जाते. मात्र, वेळेवर बाजारभाव, नैसर्गिक आपत्ती यामुळे काही समस्याही जाणवत असतात. तरीही इतर पिकांच्या तुलनेने परवडणारे पीक म्हणून ओळख बनते आहे.

मक्याचा दर २०८५ रुपयांपर्यंत

बाजारातील दर मुख्यतः आवक, हवामान, आणि राष्ट्रीय पातळीवरील मागणीवर अवलंबून असतात. सध्या मक्याचा बाजार दर हा जास्तीत जास्त २०८५ व किमान १८१० पर्यंत आहे. सरासरी १९८० रुपये दर बुधवारी (ता.१४) मिळाला. काही उच्च प्रतीच्या ३०० क्विंटल मक्याला २०८५ रुपयांपर्यंत दर मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com