Onion Crop Damage : अवकाळी पावसाने अहिल्यानगरमध्ये कांद्याचे नुकसान

Crop Damage Onion : अहिल्यानगर शहरासह संगमनेर, नेवासे, श्रीगोंदे शहर, भानगाव, आढळगाव आदी परिसरात पावसाने हजेरी लावली. पाथर्डी, शेवगावमधील काही गावांत तुरळक पाऊस झाला.
Onion Crop Damage
Onion Crop Damageagrowon
Published on
Updated on

Ahilyanagar Rain : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसत आहे. आज शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. दिवसभरात बहुतेक तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. रविवारी रात्रीही जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला होता. काही ठिकाणी डबकी साचली होती. या काळात विजेचा मात्र खेळखंडोबा पाहण्यास मिळाला.

अहिल्यानगर शहरासह संगमनेर, नेवासे, श्रीगोंदे शहर, भानगाव, आढळगाव आदी परिसरात पावसाने हजेरी लावली. पाथर्डी, शेवगावमधील काही गावांत तुरळक पाऊस झाला. अहिल्यानगर तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस येईल, असे वातावरण तयार झाले होते. तथापि, वादळी वारे व तुरळक पावसाने हजेरी लावली.

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, काही ठिकाणी ३० ते ४० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

मागील आठवड्यातही जिल्ह्यात काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती. त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सोमवारी दुपारी आणि सायंकाळी पावसाची शक्यतेमुळे शेतकऱ्यांची कांदा झाकण्यासाठी धावपळ सुरू होती. मंगळवारी कमाल तापमान सुमारे ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान सुमारे २४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.

Onion Crop Damage
Sillod Chili : सिल्लोडच्या मिरचीचा ठसका वाढणार! जीआय मानांकनासाठी करणार केंद्रीय पथक पाहणी

वीजपुरवठा खंडित, नागरिक हैराण

वादळ व पावसामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात येत होते. सोमवारी दिवसभर अनेकदा वीज गूल होती. रविवारी रात्रीही वीज नसल्याने नागरिक हैराण झाले. अहिल्यानगर शहरात उकाड्यामुळे घरात झोपणे अशक्य होत होते, तर बाहेर डासांचा उपद्रव सहन करीत काही भागात नगरकरांनी रात्र जागून काढली. वादळी वाऱ्यात काही दुर्घटना होऊ नये, म्हणून महावितरण कंपनीकडून वीज बंद केली जात असली, तरी इतर वेळी मात्र पूर्ण दाबाने वीज चालू ठेवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सावधगिरीचे उपाय

विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर जाणे टाळा.

शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी.

वादळी पावसात झाडाखाली थांबणे टाळावे.

जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे.

गरजेनुसार आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com