
Market Bulletin:
वांगी दर सुधारले
बाजारात मागील काही दिवसांपासून वांगी आवक कमी झाली आहे. मात्र दुसरीकडे वांगीला चांगला उठाव आहे. त्यामुळे वांगीचे दर सुधारले आहेत. राज्यातील बहुतांशी भागात पाऊस सुरु आहे. याचा परिणाम वांगी उत्पादनावर होत आहे. त्यामुळे आवक कमी झाली, असे शेतकरी सांगत आहेत. तर बाजारात आज वांगी सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकली गेली. बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वांगी दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज वांगी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.
डाळिंबातील तेजी कायम
वांगी बाजारातील आवक कमीच आहे. मागील महिनाभरात झालेल्या पावसाचाही डाळिंब पिकाला फटका बसला. त्यामुळे डाळिंबाचे दर तेजीत आहेत. डाळिंबाला उठाव चांगला असला तरी पुरवठा कमी आहे. त्यातही गुणवत्तापूर्ण मालाची टंचाई आहे. त्यामुळे डाळिंबाचे भाव तेजीत आहेत. डाळिंबाला आज सरासरी ७ हजार ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळाला. डाळिंबाची बाजारातील आवक पुढील काळातही मर्यादीतच राहू शकते. त्यामुळे दरही तेजीत राहतील, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
बाजरीचा भाव टिकून
बाजारातील बाजरीची आवक टिकून आहे. त्यामुळे बाजारीचे दरही मागील २ महिन्यांपासून स्थिर दिसत आहेत. यंदा देशातील बाजरीचे उत्पादन वाढल्याचा अंदाज आहे. बाजारातील आवकही चांगली आहे. परिणामी दरात अपेक्षित सुधारणा दिसली नाही. बाजारात बाजरी आजही सरासरी प्रतिक्विंटल २ हजार ४०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान विकली गेली. बाजारातील बाजारची आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते. त्यामुळे बाजारीचे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.
मोहरीच्या दरात वाढ
मोहरीचे दर मागील काही आठवड्यांपासून काहीसे सुधारले आहेत. तेलाचे दर वाढल्याचा आधार मोहरीच्या भावाला मिळत आहे. देशातील बहुतांशी भागात मोहरीचा बाजारभाव हमीभावापेक्षा जास्त झाला आहे. मोहरीमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. तसेच मोहरीच्या पेंडेला उठावही चांगला आहे. त्यामुळे मोहरीचे दर सुधारले आहेत. मोहरीला सध्या बाजारात ६ हजार ते ६ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील मोहरीची आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते. त्यामुळे मोहरीच्या दरातही काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज मोहरी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
तुरीचा भाव दबावातच
तुरीच्या बाजारातील मंदी कायम आहे. वाढत्या आयातीमुळे देशात तुरीची उपलब्धता चांगली आहे. तसेच सरकारने मार्च २०२६ पर्यंत तुरीची आयात खुली ठेवलेली. यामुळे आयात कायम राहणार आहे. याचा दबाव दरावर येत आहे. सध्या बाजारात तूर प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ५०० ते ६ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. देशात उपलब्धता चांगली असल्याने मागणीही गरजेप्रमाणे येत आहे. त्यामुळे पुढील महीनाभरतरी तुरीच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. सणांची मागणी आल्यानंतर सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.