Agrowon Podcast: ज्वारीचा भाव टिकून; गवार तेजीत, जांभळाला उठाव, मुग दबावात, सोयाबीन दर मंदीत

Daily Commodity Rates: आज आपण गवार, जांभूळ, ज्वारी, मूग आणि सोयाबीन बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market Products
Agriculture Market ProductsAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin:

गवारचे भाव तेजीत

गवारचे भाव मागील आठवडाभरात पुन्हा वाढले आहेत. गवारच्या भावातील तेजी वाढली आहे. पावसामुळे बाजारातील गवारची आवक कमीच आहे. तर गवारला उठाव चांगला मिळत आहे. त्यामुळे गवारचे भाव वाढले. सध्या राज्यातील बाजारांमध्ये गवारला सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव आहेत. पुणे मार्केटला गवार ७ हजार ५०० रुपयाने विकली गेली. तर मुंबई बाजारात सरासरी ८ हजारांचा भाव आहे. गवारची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गवारचे भावही टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

जांभळाला उठाव

जांभळाला सध्या चांगला उठाव आहे. बाजारातील जांभळाची आवक मर्यादीच दिसत आहे. राज्यातील बाजारात जांभळाच्या भावात मोठी तफावत दिसत आहे. मोठ्या शहरांमध्ये जांभळाची आवक कमी राहून दर चांगलेच तेजीत आले आहेत. त्यामुळे मुंबईसारख्या बाजारात गुणवत्तेप्रमाणे अगदी २० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. पुणे बाजारात सरासरी ७ हजारांचा दर आहे. तर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर मार्केटला जांभूळ ३ हजार ते ४ हजार रुपयाने विकले जात आहे. पावसामुळे जांभळाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Agriculture Market Products
Turmeric Seedling: हळद संशोधन केंद्राकडून एक लाखावर रोपांची विक्री

ज्वारीचे भाव टिकून

बाजारातील ज्वारीची आवक टिकून आहे. त्यामुळे दरही काहीसे स्थिरावले आहे. ज्वारीचे उत्पादन यंदा वाढले आहे. तसेच इतरही धान्याचे उत्पादन चांगले आहे. त्यामुळे ज्वारीच्या भावावर दबाव आहे. ज्वारीला उठाव आहे. मात्र, पुरवठा चांगला आहे. त्यामुळे दर काहीसे स्थिरावले आहेत, असे व्यापारी सांगत आहेत. सध्या ज्वारीला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीची बाजारातील आवक कमी होत आहे. त्यामुळे दरात काहीशी सुधारणा दिसू शकते, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market Products
Agrowon Podcast: आल्याच्या दरात सुधारणा, केळी तेजीत; आवळा-कापूस दर स्थिर, कोबीची आवक कायम

मुगाचे भाव दबावात

मुगाला बाजारात सध्या हमीभावापेक्षा खूपच कमी दर मिळत आहे. देशातील वाढलेले उत्पादन आणि वाढती आयात याचा दबाव दरावर आहे. तसेच इतर कडधान्याचे भावही कमी झाले आहेत. त्यामुळे मुगाचे भावही दबावात आले आहेत. दुसरीकडे मुगाला उठाव चांगला आहे. मात्र, पुरवठा चांगला असल्याने दर कमी आहेत. सध्या मूग प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. पुढील काळात मुगाची आवक मर्यादीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीनचे दर मंदीतच

सोयाबीनचा हंगाम सुरु होऊन आता ९ महीने झाले. सध्या बाजारातील सोयाबीनची आवक खूपच कमी आहे. तरीही सोयाबीनचा बाजार दबावात आहे. नाफेड आणि एनसीसीएफची सोयाबीन विक्री, आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी यामुळे सोयाबीनचे भाव देशातही कमीच आहेत. सध्या सोयाबीनला बाजारात ४ हजार ते ४ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीनचा देशात चांगला पुरवठा आहे. तसेच डीडीजीएसमुळे सोयापेंडवर दबाव आहे. परिणामी सोयाबीन दरावरील दबाव कायम राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com