Agrowon Podcast: आपले बाजारभाव दबावातच; कापूस, सोयाबीन, कारली, मूग दर

Daily Commodity Market: आज आपण सोयाबीन, कापूस, आले, कारली आणि मूग पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Market Update
Market UpdateAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये चढ उतार

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात चढ उतार कायम आहेत. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १०.५५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर सोयापेंडचे वायदे ३०८ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशात मात्र सोयाबीनचा बाजार मंदीतच आहेत. शिवाय मोठे चढ उतारही दिसत नाहीत.

देशातील सोयाबीनची भावपातळी आजही ३ हजार ८०० ते ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होती. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ३५० ते ४ हजार ४५० रुपयांच्या दरम्यान होते. देशातील बाजारात सोयाबीनची आवक चांगली आहे. ही आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

मुगाचा बाजार दबावात

देशातील बाजारात सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली आहे. मात्र यंदा देशात मुगाचे उत्पादन आणि आयात वाढली आहे. त्याचा दबाव दरावर दिसून येत आहे. मुगाला उठाव असला तरी भावपातळी आजही हमीभावापेक्षा कमीच दिसत आहे.

देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मुगाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Market Update
Agrowon Podcast: हरभऱ्याचे भाव टिकून; कापूस, सोयाबीन, गहू तसेच काय आहेत पपई दर?

कारल्याला चांगला उठाव

राज्यातील बाजारात सध्या कारल्याला चांगला उठाव मिळत आहे. बाजारातील कारल्याची आवक कमी आहे. बाजारातील इतर भाजीपाल्याच्या दराचाही आधार कारल्याला मिळत आहे. कमी आवक आणि चांगल्या मागणीमुळे कारल्याला भावही चांगला आहे.

सध्या बाजारात कारली प्रतिक्विंटल ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले गेले. कारल्याची आवक यापुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Market Update
Chana Rate: हरभऱ्याचा बाजारभाव यंदा कसा राहील? हरभरा आयात वाढण्याचा अंदाज

आल्याचे भाव दबावातच

आल्याचे बाजारभाव मागील काही दिवसांपासून आणखी दबावात आले आहेत. नव्या मालाची आवक सुरु झाल्यानंतर दर कमी झाले आहेत. यंदा राज्यात आले पिकाचे क्षेत्र वाढले होते. त्यामुळे आले उत्पादनात यंदा वाढ होईल, असा अंदाज आधिपासून व्यक्त केला जात होता. त्यानुसार बाजारातील आवक वाढल्यानंतर दरावर दबाव वाढत गेला.

सध्या आल्याला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ५ हजारांचा भाव मिळत आहे. बाजारातील आवकेचा दबाव आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आल्याच्या भावावरील दबाव काही आठवडे कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस स्थिरावला

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. मात्र देशातील बाजारात भावापातळी स्थिर दिसत आहेत. आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव काहीसे सुधारून ६८ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा देशातील दरावरही दबाव येत आहे.

तसेच आवकही चांगली सुरु आहे. त्याचाही दरावर दबाव येत आहे. त्यामुळे भावपातळी काहीशी सुधारलेली दिसत आहे. आजही देशातील बाजारात सध्या कापसाला सरासरी ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव होता. तर सरकी ३ हजार ४०० ते ३ हजार ६०० रुपायंच्या दरम्यान विकली जात आहे. कापसाच्या भावात काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com