Hingoli Chana Rate: हिंगोली बाजार समितीत हरभरा ५४५० ते ५५९० रुपये

Hingoli APMC Market: हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत हरभऱ्याच्या बाजार भावात किंचित चढ-उतार सुरू असून, सध्या दर ५४५० ते ५५९० रुपये प्रति क्विंटल आहे.
Chana
ChanaAgrowon
Published on
Updated on

Hingoli News: हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारमध्ये (भुसार माल मार्केट) हरभऱ्याच्या दरात किंचित चढ-उतार सुरू आहेत. हमीभावाच्या आस-पास दर मिळत आहेत. बुधवारी (ता. २३) हरभऱ्याची ३०० क्विंटल आवक होती. हरभऱ्याला प्रति क्विंटल किमान ५४५० ते कमाल ५५९० रुपये तर सरासरी ५५२० रुपये दर मिळाले.

हिंगोली जिल्ह्यात २०२४ च्या रब्बी हंगामात १ लाख ५९ हजार ७६९ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली. मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादकता वाढली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये बाजार समितीत नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली तेव्हा हरभऱ्याचे दर साडेपाच हजार रुपयांहून अधिक होते. परंतु त्यानंतर आवक वाढल्यानंतर दर ५ हजार रुपयांच्या खाली गेले होते. हमीभाव आणि बाजारभाव यांच्या ४०० ते ६०० रुपये फरक होता.

Chana
Chana Rate: हरभऱ्याचा भाव पोचला हमीभावाच्या वर

एप्रिलच्या सुरुवातीला आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत केंद्रीय नोडल एजन्सी नाफेड एनसीसीएफच्या (राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ) यांच्या वतीने हरभरा हमीभावाने (प्रति क्विंटल ५६५० रुपये) विक्रीसाठी राज्य सहकारी पणन महासंघ अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील १३ खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आली.

परंतु त्यानंतर हरभऱ्याच्या दरात सुधारणा झाली. काही दिवस कमाल दर हमीभावाच्या वर गेले. सध्या हरभऱ्याचा हमीभाव व बाजारभाव यांच्यात १०० ते २०० रुपयांचा फरक आहे. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्रावर शेतकरी नोंदणीस प्रतिसाद नसल्याने खरेदी होऊ शकली नाही.

Chana
Chana Market : हमीभावाने हरभरा विक्री नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ

बाजार समितीतील हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणा किंचित घसरण सुरू आहे. मंगळवारी (ता. २२) हरभऱ्याची ४०० क्विंटल आवक असताना प्रति क्विंटल किमान ५४५० ते कमाल ५६४५ रुपये तर सरासरी ५५४७ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २१) ५०० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ५४५० ते कमाल ५६४० रुपये तर सरासरी ५५४६ रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. १७) ३८५ क्विंटल आवक असताना प्रति क्विंटल किमान ५५०० ते कमाल ५७५० रुपये तर सरासरी ५६२५ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. १६) ४०० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ५४६० ते कमाल ५७०० रुपये तर सरासरी ५५८० रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com