
Market Bulletin:
सोयाबीनमध्ये नरमाई
सोयाबीनच्या भावात आज काहीसे कमी झाले होते. प्रक्रिया प्लांट्सनी कालच्या तुलनेत सोयाबीन खरेदीचे भाव आज ३० ते ४० रुपयांनी कमी केले होते. प्रक्रिया प्लांट्सनी आज ४ हजार २५० ते ४ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान खेरदीचे भाव काढले होते.
त्यामुळे बाजार समित्यांमध्ये आज सोयाबीनला ३ हजार ७०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील सोयाबीनची आवकही स्थिर आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापसामध्ये काहीशी सुधारणा
कापसाच्या भावात मागील दोन दिवसांमध्ये क्विंटलमागे सरासरी १०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. कापसाला मिळालेला उठाव आणि बाजारातील कमी होत असलेली आवक याचा परिणाम दरावर दिसून आला. आज बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.
पुढील सुताला उठाव मिळत आहे. त्यामुळे कापसाची मागणी सुधारत आहे, असे व्यापारी सांगत आहेत. बाजारातील आवक एक लाख गाठींच्या दरम्यान आहे. कापसाची आवक यापुढच्या काळात कमी होईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
बाजरीला चांगली मागणी
बाजरीला सध्या देशात बाजारीला मागणी टिकून आहे. तसेच बाजारातील बाजरीची आवक स्थिरावली आहे. यामुळे दरपातळीही स्थिर दिसत आहे. देशात यंदा बाजरीचे उत्पादन वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत.
पण मागणी टिकून असल्याने सध्या बाजारीला सरासरी २ हजार ६०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान वाण आणि गुणवत्तेप्रमाणे मिळत आहेत. बाजारात रब्बीतील बाजरीही दाखल होत आहे. याचा परिणाम दरावर दिसू शकतो, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.
कारल्याला चांगला उठाव
राज्यातील बाजारात कारल्याची आवक सुधारली आहे. कारल्याला चांगला उठाव मिळत आहे. मात्र बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून आला. कारल्याचे भाव मागील आठवडाभरापासून काहीसे कमी झाले.
आठवडाभरात कारल्याचे भाव क्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयांच्या दरम्यान कमी झाले. सध्या बाजारात कारली प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत. कारल्याची आवक आणखी काही दिवस कायम राहील, असा अंदाज शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करत आहेत.
गव्हाचा बाजार स्थिरावला
देशातील बाजारात गव्हाच्या भावातील चढ उतार मागील काही दिवसांपासून थांबले आहेत. सरकार खुल्या बाजारात गव्हाची विक्री करत असल्याने दरावर परिणाम दिसत आहे. गव्हाचा भाव देशभरात सरासरी २ हजार ६०० हजार ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होता पोचला. हा दर मागील आठवडाभरापासून स्थिर आहे.
गव्हाच्या भावात मागील काही दिवसांपासून आलेली नरमाई सध्या थांबली आहे. मात्र बाजारातील गव्हाची आवक वाढल्यानंतर दरावर आणखी दबाव येऊ शकतो. तसेच गव्हाचे भाव हमीभावाच्या दरम्यान येतील, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी दिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.