Agrowon Podcast: केळी दरात नरमाई; तूर बाजार, लसूण, कापूस, तसेच काय आहेत सोयाबीनचे भाव

Daily Market Update: आज आपण सोयाबीन, कापूस, केळी, तूर आणि लसूण बाजाराची माहिती घेणार आहोत.
Market Update
Market UpdateAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin:

सोयाबीनमध्ये नरमाई

सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सुरु झाले आहेत. सोयाबीनच्या भावात आज काहीशी नरमाई अनेक बाजारात दिसून आली. सोयाबीनचा बाजार आज ३ हजार ८०० ते ४ हजारांच्या दरम्यान होता. तर प्रक्रिया प्लांट्सनीही खरेदीचे भाव आज २० ते ३० रुपयांनी कमी केले. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीनची खरेदी ४ हजार ३०० ते ४ हजार ३५० रुपयांच्या दरम्यान केली. सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार कायम राहतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाचे भाव स्थिर 

कापसाचा बाजार मागील आठवडाभरापासून स्थिरावलेलाच आहे. अनेक भागात सीसीआयची खरेदी ठप्प झालेली आहे. त्याचाही परिणाम बाजारावर दिसून येत आहे. बाजारातील कापसाची आवकही आठवडाभरापासून कमी झालेली दिसते. रोज सध्या बाजारात सरासरी एक लाख गाठींच्या दरम्यान कापसाची आवक होत आहे. तर दरपातळी बाजारभाव ६ हजार ८०० हजार ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारातील कापसाची आवक यापुढच्या काळात कमी होत जाईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.   

Market Update
Onion Production: कांदा शेतकऱ्यांना रडविणार की साथ देणार?

केळी दरात चढ उतार

केळीच्या दरात काहीसे चढ उतार दिसत आहेत. केळी दरात मागील आठवड्यात किंचित घट पाहायला मिळाली. केळीचा भाव प्रतिक्विंटल १०० ते २०० रुपयांपर्यंत कमी झाला. केळीच्या आवकेत काहीशी वाढ झाली आहे. तसेच कुंभ मेळ्यासह महाशिवरात्रीनिमित्त आलेली मागणी पूर्ण झाल्याने केळी दरात किंचित घट दिसत आहे. केळीचे किमान दरही १५०० ते १६०० रुपयांवरून १३०० रुपये झाले आहेत. सध्या बाजारात सरासरी २ हजार ते २ हजार १०० रुपयांचा सरासरी दर मिळत आहे. सध्या बाजारात द्राक्षे, चिकू, कलिंगडाची काढणी सुरू झाली. याचाही परिणाम केळी दरावर झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. केळीच्या दरात चढ उतार कायम राहतील असा अंदाज व्यापारी आणिअभ्यासक वल्यक्त करत आहेत. 

Market Update
Agriculture Commodity Market : कापूस, हरभरा, तूर, हळदीच्या दरात किंचित वाढ

लसणामध्ये नरमाई 

देशातील काही बाजारात लसणाची आवक सुरु झाली. नव्या मालाची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. लसणाला उठावही चांगला आहे. मात्र वाढत्या आवकेबरोबर भावातही चढ उतार दिसून येत आहेत. लसणाचे भाव मागील काही दिवसांमध्ये क्विंटलमागे आणखी २ ते ३ हजाराने कमी झाले आहेत. सध्या लसणाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते १० हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळात लसणाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम दरावर दिसून येईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

तुरीचा भाव दबावात

बाजारात तुरीची आवक वाढत आहे तसे तुरीचा भावही कमी होत आहे. आवक वाढत असलेल्या बाजारात तुरीला ६ हजारांपासून दर मिळत आहे. तर सरासरी दर आता ६ हजार ७०० ते ७ हजारांच्या दरम्यान पोचला. दुसरीकडे तुरीला यंदा ७ हजार ५५० रुपये हमीभाव सरकारने जाहीर केला. सरकारनेही राज्यात तुरीची खरेदी जाहीर केली. मात्र बाजारातील आवक वाढल्यानंतर तुरीच्या भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com