Onion Rate : कांद्याला मिळेना उत्पादन खर्चाएवढाही भाव

Farmer Issue : आळेफाटा परिसरात पहिल्या टप्प्यात लागवड झालेल्या कांद्याच्या काढणीला वेग आला आहे. मात्र कांद्याला उत्पादन खर्चाएवढाही दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत.
Onion Rate
Onion RateAgrowon
Published on
Updated on

Alephata News : आळेफाटा परिसरात पहिल्या टप्प्यात लागवड झालेल्या कांद्याच्या काढणीला वेग आला आहे. मात्र कांद्याला उत्पादन खर्चाएवढाही दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत.

साधारणपणे सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यात लावलेला कांदा काढणीला आला आहे. आळेफाटा परिसरातील आळे, राजुरी, वडगाव आनंद, बोरी बुद्रूक, बोरी खुर्द, कोळवाडी, संतवाडी, उंचखडक, वडगाव कांदळी या गावांमधील शेतकरी सध्या कांदा काढताना दिसून येत आहेत.

Onion Rate
Farmers Issue : शेतकऱ्यांभोवती संकटांचा पाश कायम!

कांद्याला उत्पादन खर्चाएवढाही बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. सध्या कांद्याला ५ ते १२ रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. यामधून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. इंधनाचे भरमसाट वाढलेले दर, मजुरी, मशागत आदी खर्चांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

रासायनिक खते तसेच औषधांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात गेल्या वर्षीच्या तुलनेने दुप्पट वाढ झाली आहे. कांद्याचे दर मात्र कवडीमोल आहेत. यंदा कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली होती.

Onion Rate
Onion Rate : कांद्याची आवक कमी; तरी भाव खालीच

वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यामुळे काही प्रमाणात उत्पादनात घट आली आहे. कांदा जास्त काळ टिकून राहील की नाही याबाबत शेतकऱ्यांना साशंकता आहे. तसेच एका किलोला साधारणपणे १२ ते १४ रुपये खर्च येत आहे. दर मात्र अतिशय कमी मिळत असल्याने शासनाने हमी भावाने कांदा खरेदी करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

मजुरांअभावी शेतकरी मेटाकुटीला

यंदा कांदा काढणीसाठी मजुरांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. कांदा काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने ३०० रुपये असणारी मजुरी ५०० रुपयांपर्यंत गेली आहे. शेतकऱ्यांना एकरी १५ ते २० हजार रुपये कांदा काढणीचा खर्च येत आहे. मजुरांना मजुरीबरोबरच प्रवास खर्च द्यावा लागत असल्याने खर्चात वाढ झाली आहे.

गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कांद्याच्या उत्पादन खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. त्यातच शासनाने कांद्याची निर्यात बंद केल्याने दर अतिशय कमी आहेत. झालेला खर्च सुद्धा निघत नाही. शासनाने हमीभावाने कांदा खरेदी करावा व कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे
संदीप कोरडे, कांदा उत्पादक शेतकरी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com