Dam Water Storage
Dam Water StorageAgrowon

Water Storage : धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर; अनेक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाणीसाठा

Dam Storage : देशातील महत्वाच्या जलाशयांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर आहे. सध्याचा पाणीसाठा १० वर्षांमधील निचांकी पातळीवर पोचला. तर महत्वाच्या २३ जलाशयांमधील पाणीसाठी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे.
Published on

Dam Water Storage : पुणेः देशातील महत्वाच्या जलाशयांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर आहे. सध्याचा पाणीसाठा १० वर्षांमधील निचांकी पातळीवर पोचला. तर महत्वाच्या २३ जलाशयांमधील पाणीसाठी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. मोठ्या जलाशयांमधील पाणीसाठी कमी असल्याने पिकांच्या सिंचनाची समस्या निर्माण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

देशातील महत्वाच्या १५० जलाशयांमधील पाणीसाठी ३१ ऑगस्ट रोजी ११३.४१७ बिलियन क्यूबिक मिटर होता. हा पाणीसाठी या जलाशयांच्या एकूण क्षमतेच्या केवळ ६३ टक्के आहे. मागील हंगामात हाच पाणीसाठी सरासरीऐवढा होता. तर जिवंत पाणीसाठ्याचा विचार करता गेल्यावर्षीच्या तुलनेत केवळ ७७ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. तर गेल्या १० वर्षांतील सरासरीच्या ९१ टक्के जिवंत पाणीसाठा आहे, असे माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली.

देशातील महत्वाच्या जलाशयांमधील पाणीसाठा रब्बीसाठी महत्वाचा असतो. या जलाशयांमध्ये पाणीसाठा वाढला तर रब्बीसाठी पाणी उपलब्ध होते. रब्बीचं सिंचन उपलब्ध पाणीसाठ्यावर अवलंबून असते. पण सध्या या जलाशयांमध्ये पाणीसाठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. यामुळे चिंता वाढली. माॅन्सूनच्या पावसाचे तीन महिने आता संपले आहेत. केवळ सप्टेंबर महिन्यात माॅन्सूनचा पाऊस पडू शकतो. पण हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबर महिन्यातही देशाच्या अनेक भागात सरासरीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे.


Dam Water Storage
Water storage : खानदेशातील जलसाठा चिंताजनक

बिहारमध्ये सर्वात कमी पाणीसाठा
बिहारमधील जलाशयांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाणीसाठा आहे. बिहारमधील जलाशयांमध्ये सरासरीपेक्षा ६६ टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे. तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील जलाशयांमधील साठा ५७ टक्क्यांनी कमी आहे. तसेच तमिळनाडूतील जलाशयांमध्ये ५२ टक्के आणि केरळमध्ये ४९ टक्क्यांनी कमी पाणी शिल्लक आहे. उत्तर प्रेदशातील पाणीसाठा सरासरीपेक्षा ४१ टक्क्यांनी, ओडिशातील पाणीसाठा २६ टक्क्यांनी, झारखंडमधील पाणीसाठा २५ टक्क्यांनी आणि कर्नाटकातील पाणीसाठा सरासरीपेत्रक्षा २२ टक्क्यांनी कमी आहे. हिमाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगला, नागालॅंड आणि उत्तरखंडमधील जलाशयांमधील पाणीसाठा काहीसा अधिक आहे.

Dam Water Storage
Water Storage : मध्यम प्रकल्पात निम्माच पाणीसाठा

उत्तर भारतात चांगला पाणीसाठा
उत्तर भारतातील पंजाब, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमधील जलाशयांमध्ये ८३ टक्के पाणीसाठा आहे. तर मध्य भारतातील उत्तर प्रदेस, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तराखंड या राज्यांमधील पाणीसाठा ७७ टक्के आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये एकूण ७१ टक्के साठा आहे. दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमधील जलाशयांमध्ये क्षमतेच्या ४९ टक्के पाणीसाठी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com