Agrowon Podcast : बाजार समित्यांमध्ये कापूस भाव वाढले का?

Market Update : कापसाचे भाव बाजार समित्यांमध्ये ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होती. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर कापसाच्या भावातही सुधारणा होऊ शकते,
Cotton
CottonAgrowon

Market Bulletin : कापसाच्या वायद्यांमध्ये आज वाढ पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांनी ८५.५० सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता. कालच्या तुलनेत आज कापसाचे भाव वाढले होते. त्यानंतर देशातील वायद्यांमध्येही सुधारणा झाली. एमसीएक्सवर वायदे ५०० रुपयांनी वाढून ५८ हजारांवर पोचले होते.

वायद्यांमध्ये वाढ झाली मात्र बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र दबावातच होती. कापसाचे भाव बाजार समित्यांमध्ये ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होती. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर कापसाच्या भावातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात सोयाबीन आजही दबावातच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव निचांकी पातळीवरून वाढत आहेत. देशातील बाजारात मात्र सोयाबीन आजही ४ हजार ४०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजारातील आवक सरासरी १ लाख ६० हजार क्विंटलच्या दरम्यान आहे.

भावपातळी कमी असूनही बाजारातील आवक कायम आहे. कमी भावात पुरेसे सोयाबीन मिळत असल्यानेही भाववर दबाव असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. देशातील बाजारात ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Cotton
Cotton Rate : अपेक्षित भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस ठेवलाय घरात

देशातील बाजारात मक्याचे भाव टिकून आहेत. सध्या देशात मक्याला पोल्ट्रीसह पशुखाद्य उद्योग आणि इथेनाॅल उद्योगाकडून चांगली मागणी आहे. यामुळे मक्याचा भावही गेल्या महिनाभरात वाढला. मक्याचा भाव सर्वच बाजारात हमीभावापेक्षा जास्तच आहे. सध्या मक्याचा भाव २ हजार १५० ते २ हजार २५० रुपयांच्या दरम्यान आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही मक्याचा भाव मागील पाच दिवसांपासून वाढ होत आहे. मागच्या आठवड्यात मक्याच्या भावाने गेल्या तीन वर्षातील निचांकी पातळी गाठळी होती. पण आता भावात पुन्हा सुधारणा दिसून येत आहे. देशातही मक्याला आधार देण्याऱ्या घडामोडी घडत आहे. त्यामुळे मका भावातील वाढ टिकून राहील, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Cotton
Agrowon Podcast : हरभरा बाजारावर सध्या कशाचा दबाव वाढला?

गतवर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात द्राक्षाला प्रति किलोस ४० ते ६० रुपये असा दर होता. मात्र, यंदा हंगाम सुरु झाल्यापासून द्राक्षाचे दर कमी अधिक होत होते. परंतू जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांनी दर कमीच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू लागला आहे.

एक किलो द्राक्ष तयार करण्यासाठी ३० रुपये इतका खर्च येतो. सध्या द्राक्षाला २० ते ४० रुपये असा दर मिळत आहे. उत्पादन खर्चापेक्षा दर कमी मिळत असल्याने आर्थिक ताळमेळ कसा लावायचा असा प्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला पडला आहे.

गवारचे भाव मागील काही आठवड्यांपासून कायम आहेत. बाजारातील गवारची आवक कमी झाली. उठाव मात्र चांगला आहे. त्यामुळे गवारच्या भावातील तेजी कायम आहे. आजही गवारला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ७ हजार रुपये दर मिळाला.

गावरची लागवड कमी असल्याने मालही कमी उपलब्ध होत आहे. सध्या गवारच्या लागवडीही कमी दिसतात. त्यामुळे पुढील काळातही गवारची आवक कमी राहून भाव तेजीत राहण्याचा अंदाज आहे, असे भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com